[ads1]
![]()
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांचा भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात प्रविण दरेकर यांनी भरत गोगावले यांच्या कामाचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले. “भरतशेठ पालकमंत्रीच काय, मुख्यमंत्री झाले तरी लोकांमध्येच राहतील,” असे दरेकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नेमकं काय म्हणाले प्रविण दरेकर? भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाचा उल्लेख करताना प्रविण दरेकर यांनी काम करणारा माणूस या पदावर असणे गरजेचे असल्याचे सांगितले. गोगावले हे लोकांमध्ये राहून काम करणारे नेते असल्याचे त्यांनी म्हटले. “काम करणारा माणूस पालकमंत्री पदावर असायला हवा. भरतशेठ पालकमंत्रीच काय, मुख्यमंत्री झाले तरी ते लोकांमध्येच राहतील,” असा उल्लेख दरेकर यांनी केला. त्यामुळे भविष्यात भरत गोगावले यांच्याबाबत दरेकर यांनी केलेल्या या विधानाची चर्चा रंगली आहे. कोकणच्या संस्कृतीला शासकीय सन्मानाची मागणी या कार्यक्रमात प्रविण दरेकर यांनी कोकणातील पारंपरिक शक्ती तुरा नाचाच्या बारीला शासकीय स्तरावर स्थान आणि सन्मान मिळावा, अशी मागणी केली. कोकणातील लोक आपली पारंपरिक कला आणि संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील या पारंपरिक नृत्याला योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असल्याचे दरेकर म्हणाले. यासाठी विधिमंडळाच्या सभागृहात आपण मागणी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आशिष शेलार यांच्याकडेही मागणी कोकणच्या पारंपरिक नाचाला शासकीय सन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रविण दरेकर यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे या पारंपरिक कलेला सरकारी स्तरावर मान्यता आणि प्रोत्साहन मिळण्याच्या मुद्द्याला कार्यक्रमात महत्त्व मिळाले. दरम्यान, भरत गोगावले यांच्या सत्कार सोहळ्यात प्रविण दरेकर यांनी केलेल्या “मुख्यमंत्री झाले तरी लोकांमध्येच राहतील” या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हेही वाचा… एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट:तिघ्रा-टाकळी गावांकडे फिरवली पाठ, तासन्तास वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप; सरकारवर थेट निशाणा अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दौऱ्यावर होते. शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील दधम आणि व्याळा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि मोताळा तालुक्यातील काही गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, दौरा नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिराने सुरू झाल्याने मोताळा तालुक्यातील तिघ्रा आणि टाकळी या दोन गावांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिवसभर वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. सविस्तर वाचा…
[ads2]
भरतशेठ पालकमंत्रीच काय, मुख्यमंत्री झाले तरी लोकांमध्येच राहतील:प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य, भरत गोगावले यांचं केलं कौतुक
















Leave a Reply