[ads1]
![]()
केंद्र सरकारने टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, सौंदर्यप्रसाधने आणि इतर प्रसाधनसामग्रीच्या पॅकेटवर हिरवा किंवा लाल/तपकिरी ठिपका लावणे अनिवार्य केले आहे. शाकाहारी घटक असलेल्या उत्पादनांवर हिरवा, तर मांसाहारी घटक असलेल्या उत्पादनांवर लाल किंवा तपकिरी ठिपका लावावा लागेल. हे चिन्ह पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागाच्या वरच्या बाजूस लावले जाईल. सरकारने कायदेशीर मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, २०११ मध्ये सुधारणा करून ही तरतूद लागू केली आहे. २१ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होताच हे नियम लागू झाले. घटकांवरून उत्पादनाचे स्वरूप स्पष्ट होत नाही, त्यामुळे ठिपका आवश्यक नारळ, ऑलिव्ह, कोरफड, शिया बटर यांसारखे घटक वनस्पतींपासून मिळतात. लॅनोलिन मेंढीच्या लोकरीपासून, तर कोलेजन-जिलेटिन प्राण्यांपासून मिळतात. ग्लिसरीन, स्टीअरिक अॅसिड आणि फॅटी अॅसिड वनस्पती तसेच प्राण्यांच्या चरबीपासूनही बनवले जातात. नावावरून त्यांचे मूळ स्वरूप समजत नाही. अशा वेळी हिरवा-लाल बिंदू स्पष्टपणे माहिती देईल. ६० मिलीपर्यंतच्या द्रव पदार्थांच्या आणि ३० ग्रॅमपर्यंतच्या घन पदार्थांच्या पॅकवर घटकांची माहिती दिलेली नसते. तिथेही बिंदू उपयोगी ठरेल. वस्तूवर चुकीचा बिंदू दिसल्यास तक्रार कशी करावी? एखाद्या मांसाहारी उत्पादनावर हिरवा निशाण किंवा शाकाहारी उत्पादनावर लाल निशाण लावलेले असल्यास, ते नियमांचे उल्लंघन आहे. यासाठी आपण पुढील मार्गांनी तक्रार करू शकता. पॅकवर नाव, परवाना क्रमांक लिहिणे आवश्यक पॅकवर आधीपासूनच उत्पादनाचे नाव, उत्पादकाचा पत्ता, प्रमाण, बॅच क्रमांक, परवाना क्रमांक, उत्पादनाची आणि कालबाह्यता तारीख, कमाल किरकोळ किंमत तसेच वापराच्या सूचना लिहिणे आवश्यक आहे.
[ads2]
टूथपेस्ट, साबण, शॅम्पूवर लाल-हिरवा चिन्ह अनिवार्य:पाहून कळेल उत्पादन शाकाहारी आहे की नाही; नियमांचे उल्लंघन केल्यास 1 वर्षाची शिक्षा
















Leave a Reply