आईसोबत बोलताना पाहिलं अन् मुलांचा संताप अनावर:प्रेमप्रकरणाच्या संशयातून BMC अधिकाऱ्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, इगतपुरीत 53 वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू

[ads1]


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी राधाकिसन तुकाराम वारघडे (वय 53) यांचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरुडेश्वर येथे मध्यरात्रीच्या सुमारास वारघडे यांच्यावर लाठ्या-काठ्यांसह टणक वस्तूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी नाशिकला आले होते राधाकिसन वारघडे हे गणेशोत्सवाच्या सुटीनिमित्त नाशिक येथील त्यांच्या गरुडेश्वर गावात आले होते. मंगळवारी रात्री ते एका महिलेच्या घराजवळ गेले होते. त्यावेळी ते वंदना दिनेश कुंदे यांच्यासोबत बोलत असल्याचे त्यांच्या दोन मुलांनी पाहिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आईसोबत वारघडे यांना बोलताना पाहिल्यानंतर किरण कुंदे आणि दीपक कुंदे यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. दोघांनी लाठ्या-काठ्यांनी वारघडे यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने प्रहार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू हल्ल्यात वारघडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या घटनेनंतर वारघडे यांचे पुतणे कुणाल वारघडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल करून वंदना कुंदे तसेच त्यांचे दोन मुलगे किरण आणि दीपक यांना अटक केली. प्रेमसंबंधाचा संशय; पोलिसांचा तपास सुरू वारघडे आणि वंदना कुंदे यांच्यातील कथित प्रेमसंबंधातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या प्रकरणामागील नेमके कारण, हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी होती का आणि घटनेत कोणाची नेमकी भूमिका होती, याचा तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हेही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर रोहित पवारांचा निशाणा:‘शेतात मेटल डिटेक्टर कशासाठी?’ असा सवाल, ‘शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का?’ राज्यात पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, या दौऱ्याच्या नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *