[ads1]
![]()
‘एलनिनो संकटामुळे पावसात खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पीक उद््ध्वस्त झाले आहे. अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. ते रविवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे अमरावती महसूल विभागातील पीक स्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. हे वर्ष दुष्काळाचे असून, शेतकरी, शेतमजुरांच्या भावना समजून घेऊन त्यांचे काम मार्गी लावा; त्यांच्यातच देवाला पाहा,’ असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून केले. सर्वत्र पर्जन्यमानात खंड, असमानता दिसते. यंत्रणांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवून, त्यांना मानसिक आधार द्यावा, असेही ते म्हणाले. बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. सभागृहात विभागीय आयुक्त नयना गुंडे, कृषी आयुक्त परिमल सिंह, पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाचही जिल्ह्यातील ५६ तालुक्यांतील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक स्थिती, पिण्याचे पाणी, चारा आदींचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्थितीबाबत सादरीकरण केले. चारा डेपो सुरू करा : दुधाला लिटरमागे १० रुपये अनुदान देऊन चारा छावण्या सुरू करण्याची मागणी आ. हरिष पिंपळे यांनी केली. बोगस सोयाबीनच्या १० हजारांवर तक्रारी आल्या असून, गुन्हे दाखल झाल्यानंतर आता आरोपींवर कठोर कारवाई करा. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे संकट जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे संकट असल्याचे आमदार, अधिकऱ्यांनी सांगितले. काटेपूर्णात अल्प साठा असून, पाणी पिण्यासाठी आरक्षित केले. पाणीयोजनांसाठी निधी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगराला पाणी उपलब्ध होण्यासाठी अन्य स्त्रोतांचा विचार करण्यात येत आहे. पूर्णा प्रकल्पातून पाणी सोडल्यास जिल्ह्यतील नदीपात्रात पाणी जमा होऊन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे आमदार म्हणाले. तत्काळ उपाययोजना करण्याचे दिले निर्देश महावितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर वेळेत न मिळाल्याने वीजपुरवठा सुरळीत होत नाही आणि पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची अडचण होते, अशी तक्रार अनेक लोकप्रतिनिधींनी या वेळी केली. निरंतर योजनेतून नवे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावेत. नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुरूस्त व्हावेत. डीपी उघड्या व धोकादायक अवस्थेत असू नयेत तिथे तत्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
[ads2]
हे दुष्काळाचे वर्ष; शेतकऱ्यांमध्येच देव पहा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे:सरकारी यंत्रणांना दिला मंत्र, जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे संकट
















Leave a Reply