[ads1]
![]()
शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बँकेच्या मतदारांची प्रारुप यादी आज, सोमवार, २१ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या प्रारुप यादीवर हरकती आणि सूचना देण्यासाठी १० दिवसांचा कालावधी दिला जाईल. या काळात हरकतींची छाननी केली जाईल. त्यानंतर सुनावणीसह सर्व प्रक्रिया पूर्ण करून १४ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यानंतर अर्ज दाखल करणे आणि मतदानाच्या तारखा जाहीर होतील. यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांची निवड झाली होती. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून बँकेवर असलेली काँग्रेसची सत्ता अडचणीत आली. या काळात सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. गेल्या अडीच वर्षांत बँकेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा वाद झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या. आता पुन्हा एकदा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय नेते तयारी करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेवर तब्बल ४० वर्षे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे वर्चस्व होते. मात्र, अडीच वर्षांपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमुळे बच्चू कडू यांनी अध्यक्षपद मिळवले. यामुळे काँग्रेसच्या सत्तेला धक्का बसला. एडीसीसीच्या सध्याच्या संचालक मंडळाची मुदत ४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. निवडणूक कार्यक्रम वेळेत जाहीर न झाल्याने मंडळाने मुदतवाढ मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
[ads2]
अमरावती एडीसीसी बँकेची प्रारुप मतदार यादी आज जाहीर:30 सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारून 14 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल
















Leave a Reply