अत्याचारप्रकरणी वडवणीत ‎पीएसआयवर गुन्हा दाखल‎:काम मार्गी लावतो म्हणत घरात घुसून बलात्कार‎

[ads1]


तुझे काम मार्गी लावतो म्हणत पोलिस ‎‎उपनिरीक्षकाने महिलेवर अत्याचार ‎केल्याची घटना वडवणी शहरात घडली.‎या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरोधात ‎‎गुन्हा नोंद करण्यात आला आहे.‎ वडवणी तालुक्यातील २८ वर्षीय‎ पीडीतेच्या सासरच्या मंडळींविरोधात ‎‎छळाचा गुन्हा नोंद केलेला आहे. या ‎‎गुन्ह्याच्या अनुषंगाने भेट घ्यायची आहे‎ असे म्हणत वडवणी पोलिस ठाण्यात‎ कार्यरत श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गणेश ‎राठोड हा शुक्रवारी रात्री महिलेच्या घरी‎ गेला. तिथे त्याने तुझी केस मी मार्गी लावून‎ देतो असे म्हणून महिलेशी जवळीक‎ केली. महिलेने विरोध केल्यानंतर तिला ‎धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या ‎प्रकारानंतर महिलेने डायल ११२ वर संपर्क‎ केला. मात्र, सुरुवातीला तिची तक्रार‎ घेण्यासाठी वडवणी पोलिसांनी ‎सकारात्मकता दर्शवली नसल्याचा आरोप ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎महिलेने केला. त्यानंतर महिला व तिच्या ‎नातेवाईकांनी थेट पोलिस अधीक्षक ‎नवनीत काँवत यांना फोन करुन आपबिती‎ सांगितली. त्यानंतर वडवणी पोलिसांत‎ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड‎विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात‎ आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ‎वडवणी पोलिस करत आहेत. ज्या ‎पोलिस ठाण्यात पीएसआय म्हणून काम‎ केले, त्याच ठाण्यात गुन्हा दाखल‎ होण्याची नामुष्की ओढवली.‎ संशयित उपनिरीक्षकाच्या‎ निवृत्तीला केवळ ३ वर्षे बाकी‎ गणेश राठोड हा सिनिअर असून त्याच्या ‎निवृत्तीला ३ वर्षे बाकी आहेत. एएसआय ते‎ ग्रेड पीएसआय अशी त्याची पदोन्नती ‎झालेली आहे. मुलीच्या वयाच्या महिला‎ तक्रारदावर त्याने अत्याचार केल्याने ‎खळबळ उडाली आहे.‎

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *