[ads1]
![]()
उत्तर मुंबईतील राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाची मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे उत्तर मुंबईत शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल प्रकाश गुळेकर यांच्यासह शाने आलम खान, भरत चोपडे, विधानसभा समन्वयक अभिषेक चव्हाण आणि उपशाखा प्रमुख आनंद कातुर्डे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्तेही पक्षात दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कामगारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग या पक्षप्रवेश सोहळ्यात विविध पदाधिकारी आणि कामगार सहभागी झाले. स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी या प्रवेशाकडे पाहिले जात आहे. नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेशानंतर उत्तर मुंबईतील संघटनात्मक हालचाली वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. ‘शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास’ पक्षप्रवेशावेळी बोलताना सिद्धेश कदम यांनी मुंबई उपनगरातील अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत येत असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याचा दावा त्यांनी केला. युवा कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळत असल्याचेही कदम यांनी नमूद केले. काही कार्यकर्त्यांना त्यांच्या पूर्वीच्या पक्षात अपेक्षित संधी मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणावर सिद्धेश कदमांची प्रतिक्रिया दरम्यान, सिद्धेश कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून तपासातून वस्तुस्थिती समोर येईल, असे त्यांनी म्हटले. दिशा सालियन यांना न्याय मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला असून या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणावरून विविध राजकीय नेत्यांकडून परस्परविरोधी दावे आणि प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामुळे तपासातून समोर येणाऱ्या अधिकृत निष्कर्षांकडे लक्ष लागले आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमावरही टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीवरही सिद्धेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकारावर त्यांनी टीका करत राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उत्तर मुंबईतील या पक्षप्रवेशानंतर स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या हालचालींना वेग येणार का, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… सोलापूर जिल्हा बँक भाजप स्वबळावर जिंकणार:मंत्री जयकुमार गोरेंना विजयाचा विश्वास, पुणे पदवीधरबाबतही मोठे विधान
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढत्या दौऱ्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय जनता पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढून जिंकेल, तसेच जे समविचारी सोबत येतील त्यांनाही सामावून घेतले जाईल. सविस्तर वाचा..
[ads2]
मुंबईत ठाकरे गटाला धक्का:शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा, उत्तर मुंबईत राजकीय समीकरणे बदलणार?
















Leave a Reply