[ads1]
![]()
आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये पूर्वी भोजनाचा दर्जा, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेबाबत तक्रारी समोर येत होत्या. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर कळवणमधील चणकापूर आणि सुरगाणा येथील मानी येथे सुरू असलेल्या सेंट्रल किचनमुळे आश्रमशाळांच्या भोजन व्यवस्थेत बदल झाला आहे. आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने स्वयंपाक, स्वच्छतेची काळजी आणि भोजनाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवत या दोन किचनमधून २९ शासकीय आश्रमशाळांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना भोजन दिले जात आहे. पूर्वी प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्रपणे स्वयंपाक केला जात होता. त्यामुळे धान्य, भाजीपाला, इंधन, स्वयंपाकाची जागा आणि मनुष्यबळ यांचे व्यवस्थापन शाळा पातळीवर करावे लागत होते. आता चणकापूर आणि मानी येथील सेंट्रल किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी भोजन तयार केले जाते. त्यामुळे स्वयंपाकाची प्रक्रिया एका नियोजित व्यवस्थेखाली आली आहे. धान्य निवडण्यापासून भाजीपाला स्वच्छ करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. त्यानंतर आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जातो. एकाच ठिकाणी भोजन तयार होत {उर्वरित पान. ३ १२० कर्मचारी : भोजन तयार करणे, व्यवस्थापन आणि वितरणाच्या प्रक्रियेत मनुष्यबळ पॅकिंग २ अत्याधुनिक लॅब : भोजन गुणवत्ता व नमुन्यांची तपासणी करण्याची व्यवस्था २४ वाहने : सेंट्रल किचनमधून शाळांपर्यंत भोजन पोहोचवण्यासाठी ३० ते ६० मिनिटांत : गरम भोजन शाळांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन पूर्वी : प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्रपणे स्वयंपाक केला जात होता. धान्य, भाजीपाला, इंधन, स्वयंपाकाची जागा आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन शाळा पातळीवर होत होते. भोजनाचा दर्जा आणि स्वच्छतेबाबत तक्रारीही समोर येत होत्या. आता : चणकापूर आणि मानी येथील दोन सेंट्रल किचनमध्ये भोजन तयार केले जाते. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, स्वच्छतेवर नियंत्रण, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार नियोजन आणि स्वतंत्र वितरण व्यवस्थेमुळे प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध झाली आहे. शाळांवरील जेवणावर नियंत्रण ठेवणे सोपे आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण सर्व जीवनसत्त्व असणारे आहे. सेंट्रल किचनमुळे एकाच वेळी सगळ्या शाळांवरील जेवणावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले. – कश्मीरा संखे, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी
[ads2]
सेंट्रल किचनमधून 29 आश्रमशाळांत 10 हजार विद्यार्थ्यांना ‘सुरक्षित’ घास:कळवणमधील चणकापूर तर सुरगाण्यातील मानी येथे किचन सुरू
















Leave a Reply