Onion price rises by 82% in three and a half months, price at 54/kg, prices have stabilized, will come down soon

[ads1]

  • Marathi News
  • National
  • Onion Price Rises By 82% In Three And A Half Months, Price At 54 Kg, Prices Have Stabilized, Will Come Down Soon

नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जून-सप्टेंबर दरम्यान देशात कांद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून रोजी कांद्याचा अखिल भारतीय सरासरी किरकोळ भाव २९.५० रुपये प्रति किलो होता. १७ सप्टेंबर रोजी तो वाढून ५३.७८ रुपये प्रति किलो झाला. म्हणजे साडेतीन महिन्यांतच कांद्याचे भाव ८२.३% ने वाढले. घाऊक बाजारात १ जून रोजी हा भाव २२.६० रुपये किलो होता. तो १७ सप्टेंबरला ४५.६८ रुपये झाला.

एक्स्पर्ट व्ह्यू

निवृत्ती न्याहारकर, प्रमुख कांदा उत्पादक संघ, लासलगाव

कांदा इतका महाग का झाला?

महाराष्ट्रात उन्हाळी कांद्याच्या पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. केंद्रीय संस्थांच्या स्टॉकमधीलही ३०% कांदा खराब झाला. यामुळे बाजारात चांगल्या कांद्याची उपलब्धता कमी झाली.

भाव कधीपर्यंत घटतील? बियाणे कंपन्यांकडून खरेदी पूर्ण झाल्यानंतर कांदा ५ ते १० रुपये स्वस्त होऊ शकेल.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *