नांदेडमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या; ९.८३ लाखांचा ऐवज लंपास

[ads1]

नांदेड (प्रतिनिधी) -शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देगलूर नाका परिसरात ९ लाख १४ हजारांची घरफोडी

इटवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुसरो नगर, देगलूर नाका, नांदेड येथे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरफोडी झाली. फिर्यादी मोहम्मद मुब्बरुद्दीन खाजामुनिरोद्दीन (वय ३४) यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोने-चांदीचे दागिने असा ९ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३)(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

मुदखेडमध्येही घरफोडी; ६९ हजारांचा ऐवज चोरीला

दुसरी घटना मुदखेड येथील कृष्णा नगर परिसरात घडली. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी मिनाक्षी परमेश्वर मुंगळ (वय ३४, रा. कृष्णा नगर, मुदखेड) यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ठाकूर करीत आहेत. दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.


Post Views: 95










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *