[ads1]
![]()
रायगड जिल्ह्यातील राजकीय विरोधक असलेले मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद आता निवळताना दिसत आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी काल खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. मात्र, गोगावले यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही यावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनील तटकरे हे कधी भरत गोगावले यांच्या निवासस्थानी आले असते का? असा सूचक सवाल उपस्थित करत आमदार दळवी यांनी गोगावलेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, बाप्पाचे दर्शन घेणे यात काहीही गैर नाही. परंतु, आपण केलेला राजकीय संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहता गोगावले यांनी घेतलेली ही भूमिका चुकीची आहे. त्यामुळे अशा गोष्टी गोगावले यांनी टाळाव्यात, असा थेट सल्लाही आमदार दळवी यांनी दिला आहे. नेमके काय म्हणाले महेंद्र दळवी? महेंद्र दळवी म्हणाले, पालकमंत्री पद भरत गोगावले यांना मिळू नये यासाठी तटकरे कुटुंबाने खरा प्रयत्न केला होता. भरत गोगावले यांना पालकमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि रायगडला न्याय दिला. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष कायम सुरू राहणार आहे. कारण तटकरे कुटुंबाचा आतापर्यंतचा प्रवास संदिग्ध आहे. यामुळे सगळीच लोक त्यांच्याकडे संशयाने बघतात, अशा परिस्थितीत भरतशेठने जाणे टाळले पाहिजे होते. आदित्य ठाकरे त्यांच्या घरी गेले तेव्हापासून उबाठाला उतरती कळा लागली पुढे बोलताना महेंद्र दळवी म्हणाले, भरतशेठ ज्येष्ठ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत पण जाणे टाळले पाहिजे. आदित्य ठाकरे जेव्हा तटकरेंच्या घरी गेले तेव्हापासून उबाठाला उतरती कला लागली हे त्रिवार सत्य आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होऊ देऊ नये म्हणून गोगावले यांनी जायला नव्हते पाहिजे, असे दळवी यांनी म्हटले आहे. तटकरे कुटुंब इश्यू तयार करते गणेशपर्व सुरू असताना आग्रहाने निमंत्रण दिले असेल. मात्र, तटकरे कुटुंब इश्यू तयार करते, लगेच टीव्हीला बातम्या देणे, सगळ्या गोष्टी लोकांना पोहोचवणे आणि आम्हाला हिणवणे हा त्यांचा प्रकार असल्याचा आरोप महेंद्र दळवी यांनी केला आहे. तसेच अनिकेत तटकरे विधानपरिषद निवडणूक लढले, जे काही घडले-बिघडले ते आपण बघितले. आमच्याकडे संख्याबळ अधिक असताना देखील त्यांना उमेदवारी दिली गेली, प्रोटॉकॉल पाळला नाही. तटकरेंचा हा खेळ नेहमीचाच आहे. त्यांनी रायगडमध्ये अनेक कुटुंब रस्त्यावर आणून सोडून दिली आहेत. युतीधर्म तरी तटकरेंनी पाळला? असा सवाल दळवी यांनी केला आहे.
[ads2]
भरत गोगावलेंनी घेतले तटकरेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन:सुनील तटकरे कधी तुमच्या घरी आले असते का? आमदार महेंद्र दळवींची नाराजी
















Leave a Reply