नांदेडच्या खेळाडूंची आणखी किती हेळसांड?२५ एकर जागा असूनही जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न मंत्रालयातच अडकला!

[ads1]

२०२० पासून प्रस्ताव प्रलंबित*नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनचा पुन्हा आक्रमक पाठपुरावा — सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सकारात्मक आश्वासन

नांदेड  (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्याला सक्षम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांचे व्यासपीठ मिळावे, यासाठी यासाठी नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना नांदेड विमानतळ येथे आले असता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी ऑलम्पिक संघटनेचे चेअरमन जनार्दन गोपिले कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी उपाध्यक्ष डॉक्टर रमेश नांदेडकर, बाबुराव खंदारे संघटनेचे महासचिव बालाजी पाटील जोगदंड,खजिनदार प्रा जयपाल रेड्डी डॉक्टर राहुल वाघमारे उपस्थित होते,यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप निर्णायक यश मिळालेले नाही. कौठा-असर्जन परिसरातील गट क्रमांक १११, ११२, ११३, ११४ व ११५ मधील सुमारे २५ एकर शासकीय जागेवर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव जमीन हस्तांतरण व ना-हरकत प्रक्रियेत अडकून पडल्याचा दावा नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे.
या प्रस्तावामागे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचा पाठपुरावा झाल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे . सुरुवातीला सुमारे ३० एकर जागेचा प्रस्ताव होता; त्यानंतर तो २५ एकरांवर आला. २०२० पासून हा विषय प्रलंबित असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
यासंदर्भात २०२५ मध्येही नांदेडमधील २५ एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे अनेक वृत्त देखील विविध वर्तमान पत्रात प्रकाशित झाले होते.
फाईल मंत्रालयात, खेळाडू मैदानाबाहेर!
एकीकडे नांदेडमधील खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्यासाठी संघर्ष करीत आहेत; मात्र दुसरीकडे त्यांना दर्जेदार सराव, स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे.
ज्या जिल्ह्यातून अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात,
नांदेडमध्ये विविध क्रीडा सुविधांशी संबंधित शासकीय कामे आणि निविदा होत असल्याचे नोंदींमधून दिसते; मात्र प्रस्तावित बहुविध जिल्हा क्रीडा संकुलासाठी जमीन हस्तांतरणाचा प्रश्न स्वतंत्रपणे निकाली निघालेला नसल्याची बाब असोसिएशनने पुढे आणली आहे.
 आमरण उपोषणानंतरही प्रश्न कायम
नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनने या मागणीसाठी यापूर्वी महासचिव बालाजी पाटील जोगदंड प्रा जयपाल रेड्डी आमरण उपोषण केले,आंदोलने केली आहेत. स्थानिक पातळीवर पाठपुरावा करूनही विषय मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको, तर जमीन हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नांदेड विमानतळावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन
या पार्श्वभूमीवर लातूर दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी पत्रकाराने नांदेडच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न उपस्थित केल्यावर, “आत्ताच माझ्याकडे निवेदन आले आहे. जर शासनाची जागा असेल तर त्यावर सकारात्मक विचार करू,” असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे असोसिएशनने सांगितले.
आता हे आश्वासन प्रत्यक्ष निर्णयात कधी रूपांतरित होते, याकडे नांदेडच्या खेळाडूंचे लक्ष लागले आहे.
 नांदेडला क्रीडा संकुल मिळणार तरी कधी?
नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल स्पष्ट आहे—
“खेळाडूंनी पदके आणायची, पण त्यांच्यासाठी मैदान, सुविधा आणि प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची?”
पुणे-बालेवाडीच्या धर्तीवर नांदेडमध्ये आधुनिक आणि बहुविध क्रीडा सुविधा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असताना फाईल, जमीन हस्तांतरण आणि ना-हरकत प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत खेळाडूंचे भवितव्य अडकून ठेवणे थांबवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
 *निवेदन देताना उपस्थित*
ऑलिम्पिक असोसिएशनचे चेअरमन व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त जनार्दन गोपिले, अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, डॉक्टर रमेश नांदेडकर बाबुराव खंधारे महासचिव बालाजी पाटील जोगदंड डॉक्टर राहुल वाघमारे ,कोषाध्यक्ष प्रा. जयपाल रेड्डी, आदी उपस्थित होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *