[ads1]
![]()
पुण्यातील कात्रज परिसरात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरासह भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माया रेड्डी ही मूळची हैदराबाद येथील रहिवासी होती. वैद्यकीय शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती. कात्रज परिसरातील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. शिक्षणाच्या निमित्ताने ती कात्रजमधील एका सोसायटीमध्ये आपल्या भावासोबत राहत होती.
नेमकं काय आहे प्रकरण बुधवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास माया राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील नागरिक आणि सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही माया रेड्डीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तिने अभ्यासाचा ताण असल्याचे आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितले होते. त्यामुळे अभ्यासाच्या तणावाचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. वैयक्तिक किंवा इतर कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचाही तपास केला जात आहे. मित्र-मैत्रिणी आणि भाऊ घटनास्थळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर माया रेड्डीचा भाऊ तसेच तिचे मित्र-मैत्रिणी घटनास्थळी पोहोचले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिच्या सहकारी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मायाच्या मोबाईल फोनसह इतर बाबींचीही तपासणी केली जात असून, तिच्या जवळच्या व्यक्तींकडून माहिती घेतली जात आहे. या तपासातून घटनेमागचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. पुण्यात MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या:आर्थिक विवंचना आणि पेपरफुटीचा ताण; अभिजीत दिपकेंचा सरकारवर संताप विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने नैराश्य आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पेपरफुटीच्या वाढत्या प्रकारांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा
[ads2]
















Leave a Reply