[ads1]
![]()
नवरात्र उत्सव हा हिंदूंचा सण आहे त्यामध्ये हिंदुत्ववादी लोकांनीच आले पाहिजे, असा आग्रह गेल्या काही दिवसांपासून धरला जात आहे. मुळामध्ये इतर धर्मीय लोकांनी या सणामध्ये यायचे का त्याला विरोध करायचा का नाही याबद्दल दुमत आहेत. पण ज्या पद्धतीने गरब्यामध्ये येत लव्ह जिहाद केला जातो त्याला आमचा विरोध आहे, त्यामध्ये येत हिंदू माता-भगिणींवर नजर ठेवणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी एक नियम करावा अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते करत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, लव्ह जिहाद सारखे प्रकार घडत आहेत त्यामध्ये केवळ हिंदू धर्मींयांनाच परवानगी मिळावी अशी मागणी केली जात आहे. चांगल्या भावनेने जर कोणी येत असेल तर काही हरकत नाही पण लव्ह जिहादचा अजेंडा असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे, म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. पण हे म्हणजे हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवण्यासारखे होईल. 2019 पासून उबाठा गटाकडून हे होत आहे. युती म्हणून निवडून आल्यावर दरोडा टाकत काँग्रेससोबत जाऊन बसलात त्यामुळे 2024 ला जनतेना तुमचा मुद्देमाल जप्त करत तुमच्या आमदारांची संख्या 14 आमदारांवर आणून ठेवली. बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण घेत तुम्ही काँग्रेससोबत बसणार आहात का? की स्वा.सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसोबत बसणार आहात का? असा सवाल नवनाथ बन यांनी केला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या वळचणीला बसणार का? नवनाथ बन म्हणाले की, धनुष्यबाण पेलवण्याची ताकद उबाठामध्ये नाही. त्यांचा आता बचतगट झाला आहे. जनतेने शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा हा निकाल 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. धनुष्यबाण घराघरात पोहोचवण्याचे काम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केले आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि गुलामांनी केले नाही. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी तो घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आणि आजही एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी ते काम करत आहेत. राऊतांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर नवनाथ बन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच राहुल गांधी, सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी स्वप्न बघितले नव्हते. माझ्यापक्षाची काँग्रेस होणार असेल तर दुकान बंद करेल असे बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले होते. राऊतांना जर विसरण्याचा आजार असेल तर ती चित्रफित मी राऊतांना पाठवतो त्यांनी पुन्हा एकदा ती बघावी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. हे ही वृत्त वाचा
मनोज जरांगे पाटलांचा उपयोग संपल्याने सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले:सरकारला त्यांना मारायचंय, खासदार संजय राऊतांचे गंभीर आरोप
सरकारच्या मते मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे. त्यांना मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे, आता त्यांच्या उपोषणाचा सरकारने निवडणुकीत फायदा घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सरकारसाठी गळ्याचा फास बनला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही, हे अत्यंत अमानुष आहे. कोणीतरी त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे त्यातून काय मार्ग निघेल हा पुढचा प्रश्न आहे. वाचा सविस्तर
[ads2]
















Leave a Reply