[ads1]
![]()
येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी आपल्या पथकासह सेंटरला भेट देत सोनोग्राफी मशीन, रुग्ण तपासणीच्या नोंदी तसेच विविध कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश टापरे हेही उपस्थित होते. ही कार्यवाही ७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने २४ ऑगस्ट रोजी गर्भलिंग तपासणीबाबत शासकीय सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत डॉ. टापरे यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करत सदर कार्यवाही प्रारंभ केली. या समितीत येथील डॉ. प्रदीप सोनटक्के, डॉ. गुलाब पवार आणि डॉ. नितीन इंगळे यांचा या समावेश आहे. चौकशी समितीने तक्रारदार तसेच सेंटरचे संचालक डॉ. अरबट यांचे जबाब नोंदवल्याची माहिती आहे. प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरून समितीने तब्बल ६० डॉक्टरांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवला असल्याची माहिती आहे. संबंधित अधिकृत अहवालानंतरच चित्र स्पष्ट होणार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार यांच्या पथकाने सेंटरमधील सोनोग्राफी मशीनची पाहणी करण्यासोबतच रुग्ण तपासणीशी संबंधित नोंदी, कागदपत्रे आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी केल्याची माहिती आहे. या तपासणीत कोणत्या बाबी निदर्शनास आल्या, याबाबत अधिकृत अहवालानंतरच चित्र स्पष्ट होणार.
[ads2]
गर्भलिंग तपासणीची तक्रार; अरबट सोनोग्राफी केंद्राला भेट:खामगावात जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी
















Leave a Reply