[ads1]
![]()
पुण्यात कोंढवा परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायात गोळी लागली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास लक्ष्मीनगर भागातील गणपती मंडळाच्या मांडवाजवळ घडली. सौरभ आणि त्याचा मित्र सागर पंधरकर गप्पा मारत उभे होते. आरोपींचे सागर पंधरकरसोबत पूर्वी वाद झाले होते. आठ ते दहा आरोपी मांडवाजवळ आले. त्यांनी सौरभला शिवीगाळ केली आणि देशी बनावटीच्या पिस्तुलातून त्याच्यावर गोळीबार केला. गोळी सौरभच्या पायात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस घटनास्थळी पोहोचले. फरार आरोपींचा शोध सुरू असून, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोह उर्फ चिक्क्या सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील या घटनेपूर्वी ५ सप्टेंबर रोजी रात्री कात्रजमधील आंबेगाव परिसरातही अशाच प्रकारची गोळीबाराची घटना घडली होती. सोसायटीच्या आवारात झालेल्या या गोळीबारात चंद्रकांत रामदास माने (वय २०) हा जखमी झाला होता. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती.
[ads2]
पुण्यात कोंढवा परिसरात तरुणावर गोळीबार:पूर्ववैमनस्यातून पायात गोळी लागून जखमी; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
















Leave a Reply