एकनाथ शिंदे यांनी पाप केलंय:गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

[ads1]


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त करत, एकनाथ शिंदे यांनी पाप केलं असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार आहे, अशी घणाघाती टीका केली आहे. सरकार समाजाला वेड्यात काढत असून ‘आम्ही जातो आणि ते ऐकत नाहीत’ असे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देताना जरांगे म्हणाले की, फडणवीस, मराठ्यांवर वार करू नका. तुम्ही विमानात बसून उडून जाताल आणि ते दंगली लावतील. तसेच, आम्हाला केवळ आमच्या हक्काचे द्या, ओबीसींचा टक्का आम्हाला नको, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी पुन्हा एकदा मांडली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, भाजपमध्ये सहा गट आहेत. प्रत्येकाला वाटते त्याचे नाव येऊ नये. त्यांच्यात ओढाताण आहे. भाजपमध्ये एकमेकांना संपवत आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले. संभाजीनगरला जाऊन नुसत्या बैठका घ्यायच्या. मिडीयात दाखवायचे आणि तातडीने मंत्री फडणवीस यांच्याकडे गेलो काहीतरी आदेश होण्याचा अंदाज आहे, असे फक्त दाखवायचे असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जसे काही गोकुळात राहतात आणि तिथे बसून दही काढतात का? असा सवालही जरांगे यांनी केला आहे. लाडकी बहीण चप्पल घेऊन तयार पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, लाडकी बहीण नीट बोलत नाही, ती चप्पल घेऊन तयार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अनुदान नाही. पीक विमा नाही. शिंदेंनी लाडकी बहीण आणली, लाडकी बहीण त्यांना खपली नाही. तर फडणवीस यांनी लाडकी दीडी आणल्याचे जरांगे म्हणाले. 2023 पासून 2026 पर्यंत वेळ नाही तर काय दिले? सरकार सगळ्यांना वेड्यात काढत आहे. 2023 पासून 2026 पर्यंत वेळ नाही तर काय दिले? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, शिंदेंचा गुरु शिरसाट आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका, ही जात संयमी आहे, तऱ्हाला लागली तर फार विचित्र आहे. सरकारचा डाव आहे. बावनकुळे यांचे माझे लागले होते, तर त्याच्या विरोधात भाजपची काही लोकांनी माझ्याकडे गबाळ आणून ठेवले. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची आणि उपोषण न सोडण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या बेमुदत उपोषणामुळे मराठा समाज अधिकच आक्रमक झाला असून, राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे आणि आंदोलने करण्यात येत आहेत. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 8 वा दिवस:उपचार अन् पाणी त्यागल्याने प्रकृती खालावली; आंतरवली सराटीत आंदोलकांची प्रचंड गर्दी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक उपोषणस्थळी दाखल झाले असून आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी काल रात्रीपासून वैद्यकीय उपचार, सलाईन आणि पाणी घेण्यास पुन्हा नकार दिल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांची चिंता अधिक वाढली आहे. इथे सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *