रस्त्याकडे झुकलेला विद्युत खांब; अपघाताचा धोका वाढला, तातडीने दुरुस्तीची मागणी …


रस्त्याकडे झुकलेला विद्युत खांब; अपघाताचा धोका वाढला, तातडीने दुरुस्तीची मागणी

नांदेड | प्रतिनिधी

उदय झेरॉक्स ते शिवाजी स्मारक मार्गावरून एसपी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक विद्युत खांब धोकादायकरीत्या रस्त्याच्या दिशेने झुकला आहे. खांबाची वाढलेली झुकण्याची स्थिती पाहता तो कधीही कोसळण्याची शक्यता असून, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक व नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित विभागाने या खांबाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती किंवा सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

#news #nanded #poll #electricity



Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *