[ads1]
![]()
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत असून, या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः जरांगे यांच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या एक-दोन दिवसांत आपण मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेणार असून, पुढील 24 तासांत या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत म्हणाले, माझे मित्र म्हणून, तसेच आमचे संबंध राजकारणाच्या आंदोलनाच्या पलीकडचे आहेत. म्हणूनच मी त्यांना विनंती करेन कोणाच्या गैरसमजामधून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वाईट बोलू नये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील वाईट बोलू नये. त्यांनी गैरसमज दूर करावा. शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मी जरांगे यांच्या संपर्कात आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. जरांगे यांचा गैरसमज साफ चुकीचा आहे पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, मनोज जरागे यांचा उपोषणाचा कार्यक्रम आहे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित केलेला नव्हता, असा जर जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तर तो साफ चुकीचा आहे. दोन महिन्यांपासूनच हा युवा संवाद आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. 7 जुलैला हा कार्यक्रम होता मात्र एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे त्या दिवशी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. कुणालाही काउंटर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा कार्यक्रम नव्हता, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात शंका निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला नव्हता. मराठी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न शेतकरी मेळाव्यामधून झालेला नाही. मनोज जरांगे यांनी खासदार जाधव यांना फोन केला, त्यावेळेला हजारो लोक जमले होते. शिंदे साहेबांना हा मेळावा करावा लागला, असे उदय सामंत यांनी सांगितले. जरांगे यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांचा मला काल फोन आला होता. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं आंदोलनात होत राहतील, मागण्या देखील मान्य होतील. परंतू जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची देखील काळजी घेतली पाहिजे, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच असे सांगणारे नेतृत्व हे शिवसेनेचे नेतृत्व आहे. त्यामुळे जरांगे यांचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, तो खोटा आहे. जरांगे यांनी शिंदे यांच्याबाबतीतला गैरसमज दूर करावा. एकनाथ शिंदे यांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देणारी ठरली आहे. पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, खासदार संजय जाधव यांनी देखील वेळोवेळी मनोज जरांगे यांचे समर्थन केले आहे. एकनाथ शिंदे जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेतात, ते मराठा आरक्षणात अडचण यावे अशी भूमिका कधीच घेणार नाहीत, याची खात्री मनोज जरांगे यांनी बाळगावी, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
[ads2]
एक-दोन दिवसांत मनोज जरांगेंना भेटणार:पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, मंत्री उदय सामंतांचे मोठे विधान
















Leave a Reply