जंगलात 3-4 महिन्यांपासून सुरू होता लुटमारीचा हैदोस:उमेश भोयर निघाला टोळीचा ‘मुखिया’, ओळख परेड झाली, पोलिसांकडून नावे समोर, पाचही आरोपी गजाआड
.


मित्रासोबत फिरायला गेलेल्या अठरा वर्षीय तरुणीवर भानखेड -वडाळी जंगल परिसरात २८ मार्चला रात्री एकाने अमानुष अत्याचार केला. त्याचवेळी इतर चौघांनी या तरुण-तरुणीला मारहाण केली व त्यांच्याकडील १२० रुपये जबरीने हिसकले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता मागील तीन ते चार महिन्यांपासून ही टोळी वारंवार या जंगल परिसरात जाऊन फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना सावज बनवून त्यांच्याकडून रोख रक्कम लुटण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी ३ ते ४ युगूलांकडून रक्कमसुद्धा घेतल्याचे पोलिसांना सांगितले.
ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (वय ३४), दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे (वय २५), प्रमोद नारायण वाघाडे (वय ३१), शुभभ उर्फ सोमेश्वर नारायण वाघाडे (वय २८) आणि उमेश बेनिराम भोयर (वय ४७, सर्व राहणार भानखेडा) यांना पोलिसांनी २९ मार्चला अटक केली आहे. हे पाचही आरोपी आता न्यायालयीन कोठडीत रवाना झाले आहे. दरम्यान या प्रकरणात ३ एप्रिल रोजी ओळख परेड झाली आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील व गंभीर असल्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या दृष्टीने पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत ओळख परेड होईपर्यंत गोपनीयता ठेवली असल्याचे शनिवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले आहे.
हे पाचही आरोपी ही घटना घडली तेथून जवळच असलेल्या भानखेडा येथील रहिवासी आहे. शिवाय ते शेतमजुरी व इतर मजुरीचे काम करतात. सकाळी नऊ ते पाच या काळात ते कामासाठी घराबाहेर असतात. सायंकाळी कामावरून घरी गेल्यानंतर सहा वाजताच्या सुमारास ते घरातून बाहेर पडतात. त्यानंतर वडाळी, भानखेड व परिसरात असलेल्या जंगल भागात ते आवर्जून उपस्थित राहतात. पोलिसांनी तपास केला असता मागील काही ३ ते ४ महिन्यात तीन ते चार युगुलांकडून त्या टोळक्याने रक्कम लुटली तसेच एका तरुणीची छेडसुद्धा काढली, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र या घटनेतील पिडीचा वगळता इतर कोणीही या आरोपींविरुध्द तक्रार केली नाही. या पाच जणांमध्ये उमेश भोयर हा वयानी सर्वात मोठा आहे. तोच या टोळीचा मुखिया असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी ईश्वर मरसकोल्हे या नराधमाने तरुणीवर अत्याचार केला. त्यावेळी उमेश भोयरने व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी पीडित तरुणी व तिच्या मित्राला दिली होती. दरम्यान आरोपींनी खरोखरच व्हिडिओ काढला का? याबाबत तपास करत आहे.
आरोपींनी व्हिडिओ काढला का?
