3 दिवसांपासून अवकाळीचा कहर; 620 हेक्टरवरील पिकांची नासाडी:एका व्यक्तीचा मृत्यू, गोठ्यासह 35 घरांची पडझड
![]()
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६२० हेक्टरवरील शेतिपिकांची मुख्यत्वे गहू, भुईमूग, भाजीपाला व फळपिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन दिवसात एक गोठा व ३४ घरांचीही पडझड झाले. सलग सुट्यांमुळे कृषी आणि महसूल विभागातील मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात फिल्डवर उपलब्ध नसल्याने नुकसानाचा नेमका आकडा पुढे आला नाही. परंतु याआकड्यात वाढ होण्याची दाट शक्यता यंत्रणेने वर्तविली आहे. दरम्यान आज, सोमवारी दुपारी चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारनंतर झालेला वादळी पाऊस व गारपीटच्या नुकसानाची इत्यंभूत माहिती अद्याप अप्राप्त आहे. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करण्यात आला असून तो विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आपत्ती निवारण विभागाच्या निकषांनुसार लवकरच शेतीपिके व पडझडीच्या उर्वरित. पान ४ गेल्या तीन-चार दिवसांतील अवकाळी पावसानंतर उद्या, रविवारपासून जिल्ह्याचे वातावरण कोरडे राहणार आहे. जिल्ह्यातील चौदा पैकी काही तालुक्यात तुरळक सरी कोसळू शकतात. परंतु अवकाळी पाऊस किंवा गारपीट होणार नाही. प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ झाड पडून एकाचा मृत्यू यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार ३१ मार्चच्या अहवालात झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सदर व्यक्तीचे नाव जावेद अली मीर अली कहार असून ते चांदूर बाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी होते. कृषी व महसूल यंत्रणेने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात तशी नोंद करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांना देय असलेल्या मदतीची मागणीही शासनाकडे करण्यात आली. आज वातावरण कोरडे ३५ घरांची पडझड गेल्या तीन दिवसांतील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे एका गोठ्यासह ३५ घरांची पडझड झाली. ३० मार्चच्या अवकाळी पावसामुळे चार तालुक्यातील २६ गावच्या १४ घरांची पडझड झाली. त्यानंतर ३ एप्रिलला पुन्हा चार तालुक्यातील ६ गावांमध्ये अवकाळीने कहर केला. त्यात २१ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. सदर नुकसानाचा अहवाल शासनाकडे पोहोचला आहे.
