बारामतीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व कधी नव्हतेच:तपास अहवाल येण्यापूर्वी अटक नको; चार्टर्ड विमान अपघात प्रकरणी अशोक चव्हाणांचे स्पष्ट मत

0
new-project-2026-04-05t121252421_1775371383.jpg




बारामतीची पोटनिवडणूक जर बिनविरोध झाली तर एक वेगळा मेसेज जाईल. ही प्रथा आणि संस्कृती सर्वांनी जपली तर हा वेगळा चर्चेचा विषय होणार नाही. काँग्रेसची काय अवस्था आहे हे जनतेला माहिती आहे, स्पष्टच बोलायचे झाले तर बारामतीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व कधीच नव्हते. त्यांनी निवडणूक लढवली तरी नाममात्र लढवल्यासारखे होईल, त्याचा काही उपयोग होणार नाही, असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केले जात आहे असे जय पवार यांनी म्हटले आहे, या प्रश्नावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारणामध्ये एकमेकांना टार्गेट करणे सुरूच असते त्यामध्ये काही नवीन नाही, असे त्यांनी जय पवारांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले जाते असे म्हटल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हटले आहे. या निवडणुकीत टार्गेट होण्याचा विषय येण्याचे काही कारण नाही. अहवाल आल्यानंतर कारवाई करावी अजित पवार विमान अपघात प्रकरणी VAR च्या मालकाना अटक व्हावी असे जय पवार यांनी म्हटले आहे त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, पहिले या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. चौकशीचा अहवाल पुढे आला पाहिजे. एकदम निष्कर्षाला येऊ नये.अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात यावी. देशामध्ये अनेक कंपन्या चार्टर्ड विमान सेवा देत आहेत, काळजी घेणं गरजेचे आहे, घाईने कारवाई करणे योग्य नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय अशोक चव्हाण म्हणाले की, बारामती निवडणुकीवर सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येत आहे. निवडणूक लढवायची का नाही, सपकाळ काय बोलतात, निर्णय घेतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय. बारामती पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ अशोक चव्हाण म्हणाले की, बारामती विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांचा आणि नंतर अजित पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे. तिथल्या मतदारांचे अजित पवारांवर प्रेम आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबातीलच कुणाला तरी जबाबदारी मिळावी हे सर्वांची भूमिका असेल असे माझे मत आहे. सहानभुतीने मतदान होत असते. अजित पवारांनी केलेले काम त्यांच्या कुटुंबियांनी मिळणारी सहानुभूती हा निवडणुकीचा गाभा राहणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio HealthHub – Health & Medical Doctor WordPress Theme Healthic – Sports Center & Fitness Gym WordPress Theme Healthy Living – Nutrition and Wellness WordPress Theme Healthy Pregnancy – Health & Medical WordPress Theme HEAP – A Snappy Responsive WordPress Blog Theme Hearity – Charity & Donation WordPress Theme Heat – Responsive Photography WordPress Theme Heaven Hands- Non-Profit Charity & Fundraising WordPress Theme Hecxa – Creative Design Agency Elementor Template Kit Hedmark | Clean & Minimal Responsive WordPress Blog Theme
Enable Notifications OK No thanks