भोंदू अशोक खरातच्या बँक खात्यांचे 'त्या' एका तारखेचे गूढ:विशिष्ट तारखेलाच उघडली अनेक खाती; पोलिसांसमोर नवे आव्हान

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-05t142922786_1775379551.jpg




अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका ‘विशिष्ट तारखेच्या’ गुंतागुंतीमुळे नवीन रहस्य समोर आले आहे. खरातने वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये आपली बँक खाती उघडताना एकाच विशिष्ट तारखेचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, या तारखेमागे नेमके काय गुपित दडले आहे, यादृष्टीने आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने अनेक पतसंस्थांमध्ये उघडलेली सर्व बँक खाती एकाच विशिष्ट तारखेला उघडण्यात आल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या एकाच तारखेचा खरातच्या आयुष्यात किंवा त्याच्या आर्थिक साम्राज्यात नेमका काय संबंध आहे आणि त्यामागे काही विशिष्ट उद्देश अथवा गूढ दडले आहे का, या दिशेने आता पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. समोर आलेल्या ‘त्या’ विशिष्ट तारखेला खरातने नेमकी कोणती खाती उघडली, याबद्दलची सविस्तर माहिती पोलिसांनी विविध पतसंस्थांकडून मागवली असून, या चौकशीतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली आहे. या नवीन खुलाशामुळे आता अनेक पतसंस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार पोलिस यंत्रणेच्या रडारवर आले असून, खरातच्या आर्थिक साम्राज्यातील गुपिते उघड होण्याची चिन्हे आहेत. अशोक खरात तब्बल 132 बँक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, तो तब्बल 132 बँक खात्यांचा ‘नॉमिनी’ असल्याचे उघड झाले आहे. यापैकी 100 खाती राहाता येथील समता पतसंस्थेत, तर 32 खाती सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत आहेत. या सर्व खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मोठी उलाढाल झाली असून, केवळ जगदंबा पतसंस्थेतील 32 खात्यांतून सुमारे 2.74 कोटी रुपये, तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांतून तब्बल 60 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, ही खाती जरी तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर होती, तरी त्या खातेदारांचा पतसंस्थेशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नव्हता. सर्व आर्थिक व्यवहार स्वतः अशोक खरातच हाताळत होता. जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी पोलिस चौकशीत खरातच्या प्रभावामुळे आपल्याकडून या गंभीर चुका झाल्याची कबुली दिली आहे. सध्या पोलिस या अवाढव्य आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जाण्यासाठी आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत का, याचा सखोल तपास करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio Marni – a WordPress Blog & Shop Theme Maroon – Photography WordPress Theme Marriata – Hotel & Resort Elementor Template Kit Marshmallow – Photographer WordPress Theme Martex - Software, SaaS & Startup HTML5 Template Martfury – Marketplace Multipurpose eCommerce Magento 2 Theme Martfury – WooCommerce Marketplace WordPress Theme Martian | Photography & Studio Purpose WordPress Theme Maruthi – Fitness Gym WordPress Theme Mascoolin – Fashion Store Elementor Template Kit
Enable Notifications OK No thanks