NCP Slams Bhondu kharat CDR Case; Questions Damanis Recharge Tai
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या CDR ची माहिती बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी या प्रकरणी दमानियांचा उल्लेख उपरोधिकपणे रिचार्जवाल्या ताई
.
अंजली दमानिया यांनी 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा केला होता. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते, असे त्या म्हणाल्या होत्या. या प्रकरणी त्यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व आशिष शेलार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही नाव घेतले होते. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर रिचार्जवाल्या ताई म्हणत निशाणा साधला आहे.
रिचार्जवाल्या ताई याची ऊत्तर देतील का?
सूरज चव्हाण यांनी एका पोस्टद्वारे अंजली दमानिया यांना काही प्रश्न केलेत. तसेच त्यांना या प्रश्नांची उत्तरे देण्याची विनंतीही केली आहे. ते काय म्हणाले ते खाली वाचा जशास तसे…
सूरज चव्हाण म्हणाले, रिचार्जवाल्या ताई याची ऊत्तर देतील का?
1) CDR कुठून मिळाला यावर उत्तर देताना अंजली दमानिया यानी दोन उत्तर दिली आहेत.
2) आधी ओळखत नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर पाठवली म्हणाल्या..
3) नंतर आपण म्हणालात AI च्या माध्यमातून मिळाली. खरंच? कुठलं AI अॅप लोकांचे कॉल डिटेल्स काढून देतं याबद्दल तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्यावी.
4) CDR च्या स्टेटमेंट बदल का केला ?
5) एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवर तुम्ही इतका पटकन कसा विश्वास ठेवला? ती वेरीफाय केली का? आणि केली असेल तर कशी केली? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली?
6) उद्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध राज्याच्या गृह विभागाने घेतला आणि ती माहिती खोटी निघाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का ?
7) तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती माहिती मा.मुख्यमंत्री आणि तेजस्वी सातपुतें यांना दिली.
8) राज्याचा गृह विभाग पोलीस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करतंय का ?
भोंदू बाबा खरात प्रकरणात रिचार्जवाल्या ताई भोंदू बाबा वरून लक्ष विचलित करून कोणाचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत? ताईचा CDR तपासून नेमका कोणी रिचार्ज केला याची मिळाली पाहिजे.

‘रिचार्जवाल्या ताई’वरून वाद होण्याची शक्यता
सूरज चव्हाण यांनी यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा पुन्हा एकदा ’रिचार्जवाल्या ताई’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच शब्दांत दमानिया यांच्यावर टीका केली होती, आणि आता पुन्हा त्याच उल्लेखाची पुनरावृत्ती केल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे ही वाचा…
एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन:रूपाली चाकणकरांचेही 177 कॉल; सुनील तटकरे, दीपक केसरकर, शेलारांचेही कॉल्स

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर
