बिनविरोध निवडणूक म्हणजे मतदारांवर अन्याय:राहुरीत 3 उमेदवार इच्छुक, बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झालेला नाही- संजय राऊत
![]()
राहुरीमध्ये आमच्याकडे 3 इच्छूक उमेदवार आहेत आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राजकारणात कधी कोणावर निवडणूक लढण्याची जबाबदारी पडेल सांगता येत नाही, त्यासाठी तयार रहावे लागते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ जर त्यांचे उमेदवार ठरवून ठेवत असतील तर चांगलेच आह. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा राहुरीसाठी उमेदवारांशी चर्चा करत आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा का विषयावर सर्व नेत्यांशी चर्चा केली पण अजून या विषयावर कुठलाही निर्णय झालेला नाही. बारामतीमध्ये उमेदवार का देऊ नये? निवडणूक आहे. अजित पवार यांच्याबद्दल एक आदर आहे, हा विषय आहे. पण निवडणूक लढवायाच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. यशंवतराव चव्हाण यांना सुद्धा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते, लक्षात घ्या. चर्चा करत निर्णय घेऊ संजय राऊत म्हणाले की, भाजपवाले इतर सर्व निवडणुका लढतात, त्यासाठी मतं, नगरसेवक, आमदार फोडतात ना? निवडणूक काळात सरकारला मतदान करायचे नाही असा मोठा वर्ग असतो, बिनविरोध निवडणूक झाली तर त्यांनी काय करायचे? असा सवाल राऊतांनी केला आहे. शेतकरी, कष्टकरी ज्यांना सरकारचा राग आहे, त्यांना सरकारविरोधात मतदान करायचे आहे, बिनविरोध निवडणूक अन्याय आहे. दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीसंदर्भात मविआमध्ये चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल. राणेंनी मुनींना थांबवायला हवे होते संजय राऊत म्हणाले की, नीतेश राणेंची तुलना शिवरायांशी करणे अगदी चुकीचे आहे. त्यांनी जैन मुनींना थांबवायला हवे होते. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर जे उत्तर दिले आहे ते अगदी योग्य आहे. आंध्र प्रदेशची राजधाणी कोणती हे ठरवण्याचा अधिकार त्या राज्याच्या आहे. उद्या मुंबई किंवा इतरा राज्याबद्दल असे काही करतील, हे चुकीचे आहे.
