नागपुरात दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता:आई-वडिलांच्या रागावण्याने घर सोडल्याची शक्यता, पोलिसांकडून शोध सुरू

0
a0be931c-6eed-4f98-afab-6fc6fe7d1dda_1775381178727.jpg




नागपुरातून दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी अभ्यासावरून रागावल्याने ते घरातून निघून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. आदित्य अमित मेश्राम (वय १७) आणि प्रथमेश अमित मेश्राम (वय १२) अशी बेपत्ता झालेल्या भावांची नावे आहेत. हे दोघेही सोमलवार हायस्कूल, खामला येथे शिकतात. त्यांची आई धुणीभांडी करते, तर वडील डेंटिंग-पेंटिंगचे काम करतात. शनिवारी आदित्य प्रथमेशला घेऊन घरी आला. त्यांनी बॅग भरली आणि सायकलने घराबाहेर पडले. रात्री ८.३० पर्यंत दोघेही घरी न परतल्याने आई विनीता अमित मेश्राम (वय ३९, दत्त मंदिर जवळ, भवन शाळेजवळ, त्रिमूर्ती नगर) यांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ चार पथके तयार केली आहेत. एक पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे, दुसरे नातेवाईकांकडे चौकशी करत आहे, तर तिसरे पथक परिसरात शोधमोहीम राबवत आहे. गुन्हे शाखाही या प्रकरणात समांतर तपास करत आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मुलांकडे पैसे नसल्याने त्यांनी सायकल विकण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील भंगार विक्रेत्यांकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडासे यांनी दिली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही मुलांचा सुरक्षित शोध लागावा यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. नागरिकांनाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio WordPress WooCommerce Custom Order Prefix Plugin WordPress WooCommerce Event Manager Plugin WordPress WooCommerce Marketplace Auction Plugin WordPress WooCommerce Marketplace Reward System Plugin WordPress WooCommerce Marketplace Split Order Plugin WordPress WooCommerce Multi Vendor Marketplace Plugin WordPress WooCommerce Product Compare Plugin WordPress WooCommerce Quick Invoice PDF WordPress WooCommerce Repeat Order Plugin WordPress WooCommerce Return And ExChange RMA Plugin
Enable Notifications OK No thanks