28 व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस संपन्न:श्रीनिवास जोशी, शौनक अभिषेकींच्या घराणेदार गायनाने रंगत

0
93592cb9-ed00-4368-a9dc-8e1e26db8b8a_1775385864848.jpg




२८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी यांच्या घराणेदार गायनाने संपन्न झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे ५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण आणि कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाने झाली. यानंतर श्रीनिवास जोशी यांनी राग मारवा सादर केला, ज्यात त्यांनी ‘अब मिल आये…’ ही विलंबित एकतालातील बंदिश आणि ‘गुरु बिन ग्यान…’ हा तीनतालातील छोटा ख्याल गायला. त्यांनी संत तुकाराम यांचा राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला आणि पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेला ‘आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलीया…’ हा लोकप्रिय अभंग सादर करून आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना रमाकांत राऊत (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), रवी पांचाळ, मंदार रत्नपारखी (तानपुरा) आणि गंभीर महाराज अवचार यांनी साथसंगत केली. यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे कुलसचिव आणि तबलावादक पं. विश्वास जाधव यांचे एकल तबलावादन झाले. पं. जाधव यांनी पेशकार, कायदे आणि रेला यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या पारंपरिक बंदिशींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना जीतेश जवार, वैभव कदम यांनी तबला आणि गंगाधर शिंदे यांनी संवादिनीवर साथ दिली. कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पं. शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio Moreau – Creative Portfolio WordPress Theme Moren – Fashion WooCommerce Theme Moresa – Startup Agency WordPress Theme Morgan – Creative Agency & Portfolio Elementor Template Kit Morii – Adventure Travel & Tourism Elementor Template Kit Moro – Multi-purpose Magazine Theme with Portfolio Moros – eCommerce WordPress Theme Morris – WordPress App & Product Landing Page Mortar – WPBakery Page Builder Addons Bundle Morvan – Elegant WooCommerce Theme
Enable Notifications OK No thanks