प्रत्येक घरी किमान 5 बंदुका असाव्यात:तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; मदरसे उद्ध्वस्त करण्याची मागणी

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-05t10_1775363742.png




तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करण्याऐवजी ते उखडून टाका. कारण, दाऊद इब्राहिम व अजमल कसाब अशाच मदशांतून तयार झालेत. खुलताबाद येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबरही उखटून टाका. भविष्यात देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, तर आपल्याकडेही शस्त्र असावीत. त्यामुळे एका घरात किमान 5 बंदुका असाव्यात, असे ते म्हणालेत. आमदार टी राजा सिंह यांची शनिवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे एक सभा झाली. त्यात बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, मंत्री नीतेश राणे यांनी मदरशांविषयी केलेल्या विधानाला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सर्वच मदरसे बंद करा. या मदरशांत देशविघातक शिक्षण दिले जाते. नीतेश राणेंना माझे निवेदन आहे की, त्यांनी हे अनधिकृत मदरसे बंद करण्याऐवजी कायमचे उद्धवस्त करावेत. हे मदरसे केवळ बंद केले, तर ते पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मदरशांवर थेट बुलडोझरच चालवा. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व अजमल कसाब सारखे अतिरेकी याच मदरशांत तयार झालेत. त्यामुळे नीतेश राणेंनी आपले बोल खरे करून दाखवावेत. ओरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटते का? टी राजा सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटत आहे का? असा थेट सवालही केला. ते म्हणाले, औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यानंतर आपल्याला मतदान मिळणार नाही अशी भीती तुम्हाला वाटते. पण ते तुम्हाला मतदान करणारच नाहीत हे लिहून घ्या. मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर हटवून तिथे शौचालय बांधावे अशी महाराष्ट्रातील हिंदूंची इच्छा आहे. महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको. त्याने आमच्या संभाजीराला हाल हाल करून ठार केले. त्यामुळे त्याची कबर हटवण्यासाठी मावळे हवे असतील, तर आम्ही लाखोंच्या संख्येने येऊ. घरोघरी किमान 5 बंदुका असाव्यात टी राजा सिंह यांनी यावेळी घरोघरी 5 बंदुका ठेवण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, हिंदूंनी आपल्या घरात शस्त्र ठेवले पाहिजे. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्रे ठेवणे कायदेशीर आहे. पण ते बाहेर काढून हल्ला केला तर विषय वेगळा आहे. भविष्यात युद्ध झाले आणि शस्त्र नसतील तर तुम्ही काय करणार? कसे लढणार? धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. या प्रकरणी जिथे मदत लागेल ती आम्ही करू. पण प्रत्येक घरात किमान 5 बंदुका असाव्यात. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, तर त्यांना गोळ्या घालण्यासारखी शस्त्रे आपल्याकडे असावीत, असेही ते म्हणालेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio iZPAY – Mobile App & Fintech Startup Elementor Template Kit Jagga – Real Estate Template Kit Jamaah – Mosque & Islamic Center Elementor Template Kit Janelas – Windows & Doors Services Elementor Template Kit Jango | Highly Flexible Component Based WP Theme Jannah News – Newspaper Magazine News AMP BuddyPress Jannah – Newspaper Magazine News BuddyPress WordPress Theme Jannal – Curtains & Doors WordPress Theme Jannal - Windows Curtains & Doors Service WordPress Theme Jaran – Horse Riding School Elementor Template Kit
Enable Notifications OK No thanks