सभापती निवडी झाल्या म्हणजे राजकारण संपले असे नाही:आगे आगे देखो होता है क्या, पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला थेट इशारा

0
new-project-2026-04-05t093545280_1775361937.jpg


सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी मध्ये सुद्धा भाजपचे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले .पोलिसांनी केलेली अडवणूक, काढून घेतलेले मोबाईल या घटनेचा राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या सदस्यांनी निषेध करत मतदानावर बहिष्कार टाकला या वादा नंतर पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन भाजपच्या दहशतीच्या रणनीतीला चोख उत्तर देऊ. सभापती निवडी म्हणजे राजकारणाची इतिष्री नव्हे अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. आगे आगे देखो होता है क्या असा सूचक इशारा दिला या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात आली. शंभूराजे देसाई म्हणाले जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा कालावधी सभापती निवडीनंतर संपला असे नाही कालावधी पाच वर्षाचा आहे आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवतो यापुढे आम्ही काय करू तुम्ही फक्त बघत रहा .त्यांनी आमचे सदस्य फोडले त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले . मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे म्हणाले राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात आज आमचे सदस्य जरी फोडले तरी ही वेळ त्यांच्यावर येऊ शकते आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या माझ्या कुटुंबात गेली 50 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे आम्ही या प्रकरणाचे 100% उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही . दरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्यांना पोलिसांनी मतदान प्रक्रियेसाठी जाताना चार चार वेळा तपासणी केल्याने वादावादीचे प्रसंग घडले त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले.सदस्य उशिरा सभागृहात कसे पोहोचतील असा प्रयत्न सातारा पोलिसांचा पुन्हा दिसून आला त्याचा निषेध राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दंडाला काळ्याफिती लावून केला आणि या दहशतीच्या राजकारणाचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध करत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पायरीवर बसून धरणेआंदोलन केले. अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा लोकशाहीचा खून झाला अशी कडवट टीका केली .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

WordPress Studio WooChimp | WooCommerce MailChimp Integration WooCommerce 360 Image WooCommerce Abandoned Cart Email Plugin, Recover Abandoned Carts WooCommerce Abandoned Cart Email Reminder WooCommerce Abandoned Cart Recovery – Email – SMS WooCommerce Accommodation Bookings WooCommerce Account Funds WooCommerce Additional Variation Images WooCommerce Admin Custom Order Fields WooCommerce Advance Product Label and Badge Pro
Enable Notifications OK No thanks