नांदेड विभागाची तिकीट तपासणी महसूलामध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी;12.59 कोटी महसूल प्राप्त

0
WhatsApp-Image-2026-04-01-at-17.44.24.jpeg


दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तिकीट तपासणी महसूलामध्ये उल्लेखनीय टप्पा गाठत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे

नांदेड (प्रतिनिधी)-आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान, रेल्वे गाड्या व स्थानकांवर राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमांमधून विभागाने एकूण ₹14.95 कोटी महसूल प्राप्त केला आहे. ही रक्कम मुख्यालयाने दिलेल्या ₹14.80 कोटीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त असून, आर्थिक वर्ष संपण्यास तीन दिवस शिल्लक असताना म्हणजेच 28 मार्च 2026 रोजीच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. यावरून विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची मेहनत, तत्परता आणि समर्पण स्पष्ट होते.

सध्याची कामगिरी ही आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये नोंदवलेल्या ₹12.59 कोटी या मागील सर्वोत्तम महसुलापेक्षाही अधिक असून, तिकीट तपासणी कार्यक्षमता आणि महसूल प्राप्तीत लक्षणीय वाढ दर्शविते. याशिवाय, या वर्षात नांदेड विभागाने खालील महत्त्वाचे विक्रमही नोंदवले आहेत:

* एका दिवसातील सर्वाधिक तिकीट तपासणी महसूल: ₹10.90 लाख (17 ऑक्टोबर 2025)
* महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी: ₹1.55 कोटी (ऑक्टोबर 2025)

ही यशस्वी कामगिरी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली असून, अनियमित प्रवास, विनातिकीट प्रवास (TWT) आदींवर प्रभावी नियंत्रण ठेवून रेल्वे महसूलाचे संरक्षण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सुसूत्र नियोजन, विशेष तिकीट तपासणी मोहिमा, सातत्यपूर्ण देखरेख आणि विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे समर्पण यामुळे हा उल्लेखनीय टप्पा गाठता आला आहे.  प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक / नांदेड यांनी या यशाबद्दल वाणिज्य विभाग आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत भारतीय रेल्वेसाठी महसूल वाढविण्यात दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. नांदेड विभाग प्रवाशांमध्ये शिस्त वाढविणे, प्रामाणिक प्रवासाची संस्कृती बळकट करणे आणि रेल्वे महसूल संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी पुढील काळातही कटिबद्ध राहील.


Post Views: 28






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed