FIFA World Cup 2026 | फुटबॉलप्रेमींनो वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहितीये का? वाचून बसेल धक्का!

0
FIFA-World-Cup-2026.webp.webp


FIFA World Cup 2026 | फुटबॉलप्रेमी ज्या स्पर्धेची गेली चार वर्षे आतुरतेने वाट पाहत होते, त्या फिफा वर्ल्डकप 2026 (FIFA World Cup 2026) स्पर्धेचा थरार आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अमेरिका (United States), कॅनडा (Canada) आणि मॅक्सिको (Mexico) या तीन देशांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत प्रचंड उत्साह आहे. मात्र सामन्यांची तिकीटे खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या चाहत्यांना तिकीटांचे दर पाहून मोठा धक्का बसू शकतो.

यंदाच्या स्पर्धेत प्रथमच 48 संघ मैदानात उतरणार असून एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. संघसंख्या वाढल्याने प्रेक्षकांना अधिक सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचवेळी या स्पर्धेतून विक्रमी महसूल मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, सामन्यांच्या तिकिटांच्या किंमती आता चर्चेचा विषय ठरत आहेत. सर्वात स्वस्त तिकीटही सुमारे 10 हजार रुपयांपासून सुरू होत असल्याने अनेक चाहत्यांना खर्चाचा विचार करावा लागणार आहे.

भारतीय वेळेनुसार 12 जूनच्या मध्यरात्री स्पर्धेची सुरुवात होणार असून 20 जुलैपर्यंत हा फुटबॉल महोत्सव रंगणार आहे. अमेरिकेत फुटबॉलची लोकप्रियता इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याने स्पर्धेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र उद्घाटन सामन्याच्या तिकिटांचे दर पाहता चाहत्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माहितीनुसार, उद्घाटन सामन्यासाठी श्रेणी 1 मधील तिकिटांची किंमत सुमारे 2.20 लाख रुपये इतकी आहे. तर श्रेणी 4 मधील सर्वात स्वस्त तिकीटही जवळपास 54 हजार रुपयांना उपलब्ध आहे. इतर साखळी फेरीतील सामन्यांसाठी श्रेणी 1 चे तिकीट अंदाजे 54 हजार रुपये असून श्रेणी 4 चे तिकीट सुमारे 10 हजार रुपयांपासून सुरू होते. मागणी वाढल्यास या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

FIFA World Cup 2026 | अंतिम सामन्यासाठी लाखोंचा खर्च :

स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये होणार हे अद्याप निश्चित नसले तरी अंतिम फेरीच्या तिकिटांचे दर आधीच प्रचंड वाढले आहेत. सर्वोच्च श्रेणीतील तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांना 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करावी लागू शकते. याशिवाय श्रेणी 1 मधील तिकीट सुमारे 2 लाख रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.

अंतिम सामन्यासाठी सर्वात कमी किंमतीचे तिकीटही सुमारे 20 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिकीटांचा खर्च, प्रवास, निवास आणि इतर खर्चांचा विचार करता भारतीय फुटबॉलप्रेमींना वर्ल्डकपचा आनंद प्रत्यक्ष मैदानात घेण्यासाठी मोठी आर्थिक तयारी करावी लागणार आहे.

News Title: FIFA World Cup Ticket Prices Revealed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed