नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन; महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री

0
Screenshot_10-3-2026_151555_web.whatsapp.com_.jpeg

मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी
नांदेड – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने रेणुका महोत्सव 2026 निमित्त ‘मिनी सरस’प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे.
या मिनी सरस मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
मेळाव्यात दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य व माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक मेघना कावली तसेच उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मेघना कावली यांचे आवाहन ….

https://www.instagram.com/reel/DVtJ0UZkT5K/?igsh=bXMyMWFpMWwybWt4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed