सावता परिषद नांदेड शाखेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन


नांदेड – सावता परिषद नांदेड जिल्हा शाखेच्यावतीने दि.10 मार्च 2026 मंगळवार रोजी सकाळी ठिक 9 वाजता सावित्रीबाई ज्योतीराव फुले पुर्णाकृती पुतळा आयटीआय चौक नांदेड येथे सावता परिषद, माळी महासंघ, समता परिषद व पिछडा शोषित संघटना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती, राष्ट्रमाता, पहिल्या मुख्याध्यापीका, विद्येची जननी, थोर समाजसेविका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 129 व्या स्मृती दिनानिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी प्रास्तावना मांडून आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी आठराव्या शतकात 1 जानेवारी 1848 ला पहिली शाळा स्थापन करून 1852 पर्यंत एकुण 18 शाळा त्या काळी प्रस्थापितांना न जुमानता कुणाकडूनही कसलीही मदत न घेता शाळा स्थापन करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा देवून आधुनिक काळात मुलींनी शिकले पाहिजे, असे सांगून भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची दखल घेवून त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देण्याचीही मागणी त्यांनी यावेळी सावता परिषदेच्यावतीने केंद्र सरकारकडे केली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते मा.श्री. रामचंद्र रासे अण्णा, ओबीसीचे ज्येष्ठ नेते सटवाजी माचनवार, बालाजी थोटवे, सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत, सावता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, पिछडा शोषित संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र शिंदे, शंकर सोनवणे, मारोती लुटे, सोनाजी राऊत, प्रा.मारोती शितळे, श्रीमंत राऊत, बालाजी बनसोडे, मारोती राऊत, दादाराव गडगीळे, गोपाळराव गडगीळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post Views: 156






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *