अमरावतीत पाणी कपातीचे आदेश, शेतीसाठी उपसाबंदी:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक; पिण्याच्या पाण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय




राज्य शासनाच्या दुष्काळामुळे १० टक्के पाणी कपातीच्या निर्णयाचे अमरावतीत पडसाद उमटले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालण्याचा निर्णय झाला. याबाबतचा आदेश उद्या, बुधवारी जारी केला जाईल. पिण्याच्या पाण्याबाबतचे धोरणही एक-दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रस्ताव मागवला आहे. अमरावती शहर आणि बडनेरा उपनगराला मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून पिण्याचे पाणी मिळते. या धरणातून शेतीसाठी पाणी घेणाऱ्या अवैध उपशावर लक्ष ठेवले जाईल आणि कारवाई होईल. करार केलेल्या शेतकऱ्यांसाठीही पाणी सोडण्याचे टप्पे कमी केले जातील. यापूर्वीच सर्व धरणे आणि तलावांमध्ये १० टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्याचे आदेश होते. अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांनी कमी झाला असला तरी, पिण्याच्या पाण्याची लगेच कपात होण्याची शक्यता कमी आहे. रब्बी पिकांसाठीचे पाणी मात्र थांबवले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *