डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२६ मध्ये नांदेडच्या उद्योगाचे लक्षवेधी सादरीकरण; गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले यांच्याकडून कौतुक
नांदेड : अवघ्या पाच बाय दहाच्या छोट्याशा दुकानातून सुरू झालेला व्यवसाय आज दुग्धव्यवसाय, शीतकरण आणि व्यावसायिक उपकरणांच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. ही यशोगाथा आहे नांदेड येथील श्रीराम रेफ्रिजरेशनची! मेहनत, दर्जेदार सेवा आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर संस्थेने व्यवसायाचा विस्तार केला असून, नुकत्याच कोल्हापूर येथे पार पडलेल्या डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२६ मध्ये आपल्या विविध दूध संकलन साहित्याचे सादरीकरण केले.
१६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान कोल्हापूर येथील रामकृष्ण लॉन्समध्ये आयोजित या प्रदर्शनात श्रीराम रेफ्रिजरेशनच्या उपकरणांची दूध उत्पादक आणि दुग्धव्यवसायिकांनी माहिती घेतली. प्रदर्शनाची पाहणी करताना गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. योगेश गोडबोले यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक राजेंद्र आळंदीकर, अमोल आळंदीकर आणि नितीन आळंदीकर उपस्थित होते.

१९८५ पासून सुरू झालेली यशस्वी वाटचाल!
सन १९८५ मध्ये श्री. राजेंद्र तुकाराम आळंदीकर यांनी नांदेडमध्ये अवघ्या पाच बाय दहाच्या छोट्याशा दुकानातून फ्रीज दुरुस्ती व्यवसायाची सुरुवात केली. मेहनत, चिकाटी आणि दर्जेदार सेवेच्या बळावर त्यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. त्यांच्या कष्टाचा वारसा पुढे नेत अमोल आळंदीकर आणि नितीन आळंदीकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उद्योगाला नवी दिशा दिली.
आज श्रीराम रेफ्रिजरेशन आणि आइस एज रेफ्रिजरेशन अँड किचन इक्विपमेंट यांच्या माध्यमातून वॉटर कूलर, बल्क मिल्क कूलर, दुग्धव्यवसायासाठी आवश्यक उपकरणे, कोल्ड स्टोरेज, डीप फ्रीजर, डिस्प्ले काउंटर, बेकरी उपकरणे तसेच हॉटेल उद्योगासाठी लागणारी अत्याधुनिक स्टेनलेस स्टीलची स्वयंपाकघरातील उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.
ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादने, वाजवी दर, उत्कृष्ट गुणवत्ता आणि विक्रीनंतरची विश्वासार्ह सेवा ही संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या बळावर श्रीराम रेफ्रिजरेशनने नांदेडसह मराठवाड्यात आपले स्थान निर्माण केले आहे.
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad