संजय राऊतांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही:त्यांनी फक्त स्वतःच्या गाडीत पेट्रोल आहे का, हेच पाहावे, गोपीचंद पडळकरांचा घणाघात




संजय राऊत यांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही. आपल्याकडे 25 दिवसांचा तेलसाठा उपलब्ध आहे. परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत, ते ठरवतील तेल कुठून घ्यायचे ते काय संजय राऊत यांना विचारुन घेणार आहेत का? संजय राऊत यांनी आपल्या गाडीत पेट्रोल आहे का नाही ते कुठे टाकायचे इतकाच विचार करावा, तेल कुठून आणायचे हे तुमच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांना लगावला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, संजय राऊत यांना काय वाटते हे काही महत्त्वाचे नाही, देशातील नागरिकांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भावना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांना सकाळी केवळ एक पत्रकार परिषद घेत बातमी द्यायची असते म्हणून ते अशी वक्तव्ये करतात. देशातील लोकांना माहिती अरहे की स्वातंत्र काय असते. देशातील लोकांसाठी मोदी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोदी सरकारने जनतेचा स्वाभिमान जागा केला आहे. धर्मांतरविरोधी कायद्याची गरज होतीच गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी संपूर्ण मंत्रिमंडळाचे विशेष अभिनंदन करतो. हा क्रांतिकारी कायदा पास होत आहे, हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी या कायद्याची गरजच होती. सातत्याने हिंदू समाज रस्त्यावर उतरत होता, रोज काहीना काही अशा गोष्टी घडत होत्या. लोकांचे रोज धर्मांतर केल्या जात होते, पैशाचे आमिष दाखवले जात होते, कधीतरी चमत्कार तर कधी हिंदू देवतांना शिव्या देत धर्मांतर केले जात होते. काही काही राज्यातील जवळपास सर्वच लोक दुसऱ्या धर्मांत गेले आहे. जे आदिवासी होते ते दुसऱ्या धर्मात गेले आणि कागदपत्रे मात्र आदिवासींची वापरायची, दुसऱ्या धर्मात जायचे आणि दुसरीकडे आरक्षण वापरायचे आणि पुजा पद्धतीमध्ये बदल करायचे असे सुप्रीम कोर्टाला सुद्धा मान्य नाही. मी धमक्यांना भीक घालत नाही गोपीचंद पडळकर म्हणाले की, जेव्हा आपण देवाधर्माचे काम हाती घेतो, तेव्हा धमक्यांना भीक घालत नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले, पण ते झुकले नाहीत. आपण त्यांचे मावळे म्हणून धर्माचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. माझ्याविरोधात मोर्चे निघाले पण मी काही धर्माचे काम सोडणार नाही.
लक्षवेधी वाढवण्यासाठी चर्चा करणार गोपीचंद पडळकर म्हणाले की, लक्षवेधी मांडण्यासाठी सत्ताधारी आमदारांना संधी मिळत नाही असे काही नाही. पण विरोधी पक्षांची दुतोंडी भूमिका आहे, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवला पाहिजे, एक आठवड्याचे अधिवेशन 3-4 आठवडे घेतले पाहिजे. आता कार्यकाळ वाढवला तर लक्षवेधी 3 ते 4 वर घ्यायच्या नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अधिवेशनात 10 ते 15 लक्षवेधी झाल्या तर 10 दिवसांच्या अधिवेशनात 157 लक्षवेधी चर्चेला आल्या आहेत. आता अधिवेशन सुरू होऊन 7 दिवस झाले केवळ 15 लक्षवेधी झाल्या आहेत. म्हणून आम्ही लक्षवेधीसंदर्भात अध्यक्षांना म्हणालो की लक्षवेधी वाढल्या पाहिजे. त्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करू असे सांगितले. अजित पवार अपघातावर भाष्य करणे योग्य नाही गोपीचंद पडळकर म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळ्या यंत्रणा तपास करत आहेत, त्यावर मी भाष्य करणे काही योग्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *