जुना मोंढा येथील तेल व्यापाऱ्यांची ३५ लाखांची बॅग लंपास; पंचर करून सोनेरी पद्धतीने चोरी

जुना मोंढा येथील तेल व्यापाऱ्यांची ३५ लाखांची बॅग लंपास; पंचर करून सोनेरी पद्धतीने चोरी

नांदेड :

जुना मोंढा परिसरातील तेल व्यापारी पारसेवार यांच्याकडून अंदाजे ३५ लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी अत्यंत कौशल्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना आज घडली. ही चोरी वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील बन्सल किराणा दुकानासमोर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेचे वर्णन :

मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांचे चारचाकी वाहन चोरट्यांनी आधीच जबरदस्तीने पंचर केले. वाहन थांबवण्यासाठी चोरट्यांनी एका बाजूचा टायर लक्ष्य केला.

व्यापारी वाहनातून खाली उतरताच, दुसऱ्या बाजूने दबा धरून बसलेल्या एकाने त्यांच्या गाडीमधील रोख रकमेसह असलेली बॅग झटपट हिसकावली आणि काही क्षणांत चोरटे पसार झाले.

संपूर्ण घटना काही सेकंदात घडली असल्याने व्यापाऱ्यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही.

पोलीस तपास सुरू :

घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तत्काळ वजीराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरटे कोणत्या वाहनातून आले व कोणत्या दिशेने पळून गेले याचा शोध घेतला जात आहे.

प्राथमिक अंदाजानुसार ही पूर्वनियोजित आणि रॅकेटच्या पद्धतीने केलेली चोरी असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण :

घटनेमुळे जुना मोंढा आणि बाजार परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *