10 कोटी खर्चाचा वाणिज्य संकुलाचा प्रस्ताव नगरसेवकांनी हाणून पाडला:पंढरपूरचे सीईओ रोकडे म्हणाले, सभागृह निर्णय घेऊ शकते तर नगराध्यक्षांनी संकुल प्रस्तावाला दिली स्थगिती‎


.

प्राचीन आणि पवित्र पंढरपूरचा वारसा नष्ट करू पाहणाऱ्या प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाच्या विरोधात आता पंढरपूरकर एकवटले आहेत. या प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी सोमवार, दि. २ मार्च रोजी पंढरपूर शहरात कडकडीत ‘बंद’ पाळला जाणार असून, प्रकल्प बाधितांचा एक भव्य मोर्चा तहसीलदार कचेरीवर धडकणार आहे.

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती गेल्या दोन-तीन वर्षांपासून या कॉरिडॉर प्रकल्पाला संवैधानिक पद्धतीने विरोध करत आहे. समितीचे अध्यक्ष आणि हिंदू महासभा नेते अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांनी शासनाच्या या धोरणावर कठोर शब्दांत टीका केली आहे. या बंदमध्ये सर्व बाधित नागरिक, वारकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर नगर पालिकेचे सन २०२५-२६ चा सुधारित आणि सन २०२६-२७ या वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकात शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकासकामांसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली. जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालून वर्षाअखेरीस सुमारे ३ लाख ५६ हजार ४९१ रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या विठ्ठल मंदिर परिसरातील भांडवली निधीतून १० कोटी रुपये खर्चातून वाणिज्य संकुल साकारण्यासाठीच्या आराखडा प्रस्तावाच्या विषयांवर सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी विरोध दर्शवला. नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले. सभेच्या अध्यक्षा प्रणिता भालके यांनी विषयाला स्थगिती जाहीर केली. यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्यासह भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर अंदाज पत्रकातील प्रत्येक तरतुदींवर सुमारे दोन तास चर्चा करण्यात आली. सदस्यांनी अभ्यासपूर्ण सूचना केल्या. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सादर केलेल्या अंदाज पत्रकात आरंभीच्या शिल्लकसह २०२६-२७ या वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न २७३ कोटी ४७लाख ८४ हजार ७४४ रुपये अपेक्षित आहे. त्या तुलनेत वार्षिक खर्च २७३ कोटी ४४ लाख २८ हजार २४६ रुपये इतका प्रस्तावित आहे. या अंदाजपत्रकात शासकीय कर्जाची परतफेड आणि व्याजाच्या हप्त्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर राबवण्याच्या हालचाली प्रशासनाच्या पातळीवर सुरु आहेत. याच दरम्यान, विठ्ठल मंदिराच्या परिसरात शासन निधीतून १० कोटी रुपयांची तरतूद वाणिज्य संकुलासाठी या अंदाजपत्रकात प्रस्तावित केली होती. परंतु प्रशासनाने कॉरिडॉर संदर्भात नगरपालिकेस विश्वासात घेतलेले नाही. नागरिकांचा विरोध असल्याने विठ्ठल मंदिर परिसर वाणिज्य संकुलास १० कोटींची तरतूद नको, अशी भूमिका नगरसेवक ओंकार जोशी, भागवत बडवे, राहुल शिंदे – नाईक यांनी घेतली. त्यावर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सभागृह या संदर्भात निर्णय घेऊ शकते, असे सांगितले. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी या प्रस्तावास स्थगिती देण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले. ^शासन केवळ स्वतःचे नाव करण्यासाठी या विध्वंसकारी कॉरिडॉरचा घाट घालत आहे. पंढरपूर युगानुयुगे आहे, त्यावर आपले नाव कोरण्यासाठी येथील प्राचीन वारसा नष्ट करू नका, अशी मागणी आहे. अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र बचाव समिती. . घरकुल योजना: रमाई आवास, प्रधानमंत्री आवास (१ व २) अंतर्गत गरजूंच्या घरांसाठी तरतूद. . स्वच्छता व आरोग्य: स्वच्छ भारत, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन सुरक्षा अभियानावर भर. . नागरी सुधारणा: रस्ते विकास, पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना (गटार बांधणी), . नामसंकीर्तन सभागृह आणि नाट्यगृहांचे बांधकाम. उद्यानांचा विकास, पुतळ्यांची सुधारणा आणि शहराचे सुशोभीकरण. स्मशानभूमी सुधारणा आणि आवश्यक नवीन वाहनांची खरेदी. नगरविकास खात्याच्या तज्ञ अभियंत्यांच्या मते, नवीन विकास योजनेतील सध्याचे रस्ते पुरेसे रुंद आहेत. या रस्त्यांवरील केवळ अतिक्रमणे काढल्यास आणि वाहन वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यास कोणतीही धास्ती उरणार नाही, असा दावा बचाव समितीने केला आहे. भाविकांची गैरसोय: कॉरिडॉरमुळे भाविकांची सोय होण्याऐवजी मोठी गैरसोय होणार आहे. स्थानिक सेवा सक्षम: कॉरिडॉर पेक्षा चांगली सेवा स्थानिक पंढरपूरकर भाविकांना देत आहेत. प्राचीन वास्तूंना धोका: भाविकांची प्राचीन वारसाप्राप्त घरे, मठ आणि मंदिरे पाडली जाणार. पर्यायी जागा उपलब्ध: शासनाने हवे तर मोकळ्या शासकीय जागेत कॉरिडॉर करावा.

महसुली उत्पन्नाचे स्रोत प्रमुख आक्षेप, शासकीय जागेत कॉरिडॉर करावा

नाव कोरण्यासाठी विध्वंसकारी कॉरिडॉरचा घाट घातला

प्रशासनाने विश्वासात न घेताच प्रस्ताव सादर केल्याने गदारोळ

प्रमुख विकास योजना आणि सुविधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *