मुंबई 3.0…शेतकऱ्यांच्या भागीदारीतून साकारणार आधुनिक ‘थीमॅटिक सिटी’:2 लाख रोजगार; जमिनीच्या बदल्यात 22.5% विकसित भूखंडाचा पर्याय

0
orig_new-project-2026-04-22t064438597_1776820449.jpg




मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता महानगर प्रदेशाचा (एमएमआर) चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ (तिसरी मुंबई) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ने अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जमिनीच्या बदल्यात केवळ रोख मोबदला देण्याची जुनी पद्धत मोडीत काढत, प्रशासनाने आता ‘सहभागात्मक मॉडेल’ लागू केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता केवळ ‘प्रकल्पग्रस्त’ न राहता, थेट या जागतिक दर्जाच्या शहरनिर्मितीचे ‘भागीदार’ बनणार आहेत. १८ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या मेगा प्रकल्पाची अधिकृत सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी फायद्याचे तीन पर्याय कोणते? 1 अविकसित जमिनीच्या बदल्यात २२.५% ‘विकसित जमीन’ परत मिळवण्याची सुवर्णसंधी.
2 रोख मोबदल्याऐवजी वाढीव ‘एफएसआय’ किंवा ‘टीडीआर’ स्वरूपात थेट लाभ.
3 शहराच्या वाढीव मूल्याचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा थेट वाटा स्थानिकांना मिळणार.
‘थीमॅटिक सिटी’ जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र हे शहर केवळ निवासी वस्ती नसेल, तर एक जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र असेल. यात प्रामुख्याने : Â ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) आणि डेटा सेंटर जिल्हा. Â मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक आयटी हब. Â जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा, नॉलेज इकोसिस्टम आणि लॉजिस्टिक हब. Â या माध्यमातून तब्बल २ लाखांहून अधिक उच्च-कौशल्ययुक्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील. २७ एप्रिलपासून ‘संमती पोर्टल’ होणार सुरू इच्छुक जमीनधारकांसाठी ‘एमएमआरडीए’ने ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या २७ एप्रिल २०२६ पासून नागरिक आपली कागदपत्रे आणि ओळखपत्र (उदा. आधारकार्ड) अपलोड करून आपली संमती नोंदवू शकतील. अधिक माहितीसाठी नागरिकांनी mmrda.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विश्वासाचे नाते आणि विरोध मावळला या ‘सहभागात्मक मॉडेल’मुळे स्थानिकांचा प्रकल्पांना होणारा नेहमीचा विरोध मावळला असून, सरकार आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘लोकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनेला या प्रकल्पामुळे मोठी बळकटी मिळणार असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला यातून ‘बूस्टर डोस’ मिळेल. अटल सेतू प्रभाव क्षेत्रात १२४ गावांचा कायापालट अटल सेतूच्या सान्निध्यात येणाऱ्या उरण, पनवेल व पेण या ३ तालुक्यांतील ३२३.४४ चौ.किमी क्षेत्रावर १२४ गावांच्या जमिनीवर हे शहर वसेल. जे मुंबईपेक्षा तिप्पट मोठे असेल. पहिल्याच दिवशी पेणमधून २१६ एकर भूसंपादन.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks