विरोधकांनी कधीही महिला आरक्षण विधेयक पाडले नाही:भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवायचे आहे- संजय राऊत

0
730-x-548-2025-06-24t10203267317507405921753851943_1776748746.jpg




विरोधकांकडून महिला आरक्षणासंदर्भातील कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरुन घालवायचे आहे, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहे का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर देशाची सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी 850 सदस्य करण्याचे डिलिमीटेशन बिल आणण्यात आले, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिलांना आरक्षण देण्यापासून सत्ताधाऱ्यांना कुणीही रोखले नाही. 543 पैकी 180 महिलांना तुम्ही आरक्षण द्या. त्यात जर आमच्या जागा जाणार असतील तर आम्ही तयार आहोत. भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर दोन गट आहेत. नरेंद्र मोदी यांनी जर मनात आणले असते तर ते हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. त्यांनी त्या संदर्भात चर्चा घडवून आणली असती. पण डिलिमीटेशन बिल अमित शहा यांनी आणले. हे बित त्यांच्या पुढच्या निवडणुकीची रणनिती होती. भाजपमध्ये दोन गट संजय राऊत म्हणाले की, डिलिमीटेशन बिलासाठी अमित शहा यांनी सर्व राजकीय पक्षांना फोन केले. पण या बिलांना पाठिंबा देऊ नका असा फोन सुद्धा भाजपमधूनच आला आहेत. आता उडता भाजप झाला आहे. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. फडणवीस शरद पवारांची बरोबरी करू शकत नाही संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा स्तर कोणता हे सांगायला हवे. ते भाजपमध्ये कोणत्या लेव्हलवर आहेत हे मला माहिती नाही, देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत. मोदी आणि शहा यांनी नेमलेली माणसं आहेत त्यांची लेव्हल कळत नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. केंद्रामध्ये महाराष्ट्राला एक वलय आहे. आमचे बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते त्यांना केंद्रात वलय होते.ते सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री होते, कदाचित तसे वलय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असेल. ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बोलताना भान राखले पाहिजे ते एक वकील आहेत. शरद पवारांच्या लेव्हलवर जाण्यासाठी फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतील. चर्चेला तयार आहे हे काय सांगता आम्ही लोकसभेत काय झांजा वाजवत होतो का असा सवाल राऊत यांनी केला आहे. उडता भाजप झाला संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी या महिला आरक्षण विधेयकावर झालेली लोकसभेतील चर्चा ऐकावी आणि त्यानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा यांची काय ततफफ झाले ते पहावं. याचा उडता भाजप झाला आहे. यांना कळतच नाहीये की आपण काय बोलत आहोत. मुंबईत सापडणारा ड्रग्जमुळे हे सुरू आहे का? ज्या बिलाचा आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही, डिलिमीटेशन बिल वेगळे आहे. देवेंद्र फडणवीस स्वत:ला शरद पवारांच्या उंचीचे नेते कसे ठरवतात? हे सगळे स्वत:च ठरवतात का? मग आम्ही म्हणू की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईत घेऊन घ्या. आम्ही त्यांना वडापाव, भेळ खाऊ घालू. त्यांच्यासोबत आमचा सामान्य शिवसैनिक चर्चा करेल.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks