मराठी दिनानिमित्त आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर हस्तलिखित ‘ज्ञानेश्वरी’ची भेट:सावंत यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या डौलदार अक्षर रेखाटनाच्या क्लृप्त्या‎

पैठण आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे मराठी भाषा दिन आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. जि. प. प्रशाला, नायगाव येथील निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल सावंत यांनी सुंदर व सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाची हस्तलिखित प्रत शाळ

.

स्वागतप्रसंगी सावंत म्हणाले, सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल येथील संस्कारांचे बाळकडू त्यांना आयुष्यभर प्रेरणा देत आले आहे. सकाळच्या परिपाठात विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना सावंत यांनी सुबक, डौलदार अक्षर रेखाटनाच्या क्लृप्त्या सांगितल्या. स्वतःच्या अनुभवातून अक्षरसेवा कशी जोपासली याचे प्रेरणादायी उदाहरण त्यांनी मांडले. अवघ्या १५ महिन्यांत भावार्थ दीपिका अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ पूर्ण करून सद्गुरूचरणी अर्पण केल्याचे त्यांनी नमूद केले. ही हस्तलिखित ‘ज्ञानेश्वरी’ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पूर्ण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्याध्यापक तथा संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्कर कुलकर्णी यांनी सावंत यांचा सत्कार केला. हस्तलिखित प्रत शालेय ग्रंथालयात जतन करून ठेवण्यात येणार असून ती आशुतोष पानगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सूत्रसंचालन विलास खर्डेकर यांनी केले.

विद्यार्थ्यांना आदर्श लेखनाचा प्रत्यक्ष अनुभव या हस्तलिखित ग्रंथामुळे विद्यार्थ्यांना आदर्श लेखनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ‘काना’स योग्य अंतर, मात्रा ती डोईवर, वेलांटी वा रफार डौलदार…’ या ओळींचा अर्थ विद्यार्थ्यांनी प्रत पाहताना अनुभवला. मराठी भाषेचा अभिमान आणि सुलेखनाची गोडी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणारा हा उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *