ठाणे मनपाचा तत्कालीन सहायक आयुक्त, खरातभक्त आहेरचाही महिलेवर अत्याचार:भोंदू खरातच्या नाशिक येथील कार्यालयातच केला होता अत्याचार

0
orig_new-project-2026-04-22t062806660_1776819459.jpg



भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता या भोंदू खरातचा भक्त असलेल्या ठाणे मनपातील तत्कालीन सहायक आयुक्तानेही महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक आयुक्त महेश आहेरवर ग

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आहेरने ठाणे मनपातील डाटा एंट्री ऑपरेटर महिलेला ‘तुझे भविष्य संकटात आहे’ असे म्हणून जाळ्यात ओढले. आता तुला नाशिकचे कॅप्टन खरातच वाचवू शकतात, असे आमिष दाखवले. भविष्य जाणून घेण्याकरीता तिला २०२३ मध्ये भोंदू खरातच्या ओकस प्रॉप्रटीमध्ये आणले. तेथे शीतपेयामधून गुंगीचे अौषध देत तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. या महिलेच्या तक्रारीवरून आहेरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पिडितेने एफआयआरमध्ये नोंदवलेले असे

२०२० ते सन २०२३ दरम्यान महेश भाऊराव आहेर, तत्कालिन सहाय्यक आयुक्त, ठाणे मनपा याने पदाचा गैरफायदा घेऊन त्याच्या हिरानंदानी इस्टेट रिव्हेरा बिल्डींग येथे भाड्याच्या फ्लॅटवर महिलेला नेले. तिला कोल्ड्रिंकमधून गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरिक संबंध केले. त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ते युट्युबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शरिरसुखाची मागणी केली.

दादा पाटील वाडी, नौपाडा, ठाणे येथील भाड्याचे रूममध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिकमध्ये एक प्रसिद्ध कॅप्टन अशोक खरात हे ज्योतीषी आहेत. आपण आपल्या भविष्याबद्दल त्यांच्याकडे जावुन जाणुन घेवु असे सांगून खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयामध्ये नेले. महिलेच्या इच्छेविरुद्ध महेश आहेरने तिच्यावर लिंबू उतरवले. मोती खडा गळ्यात परिधान करण्यासाठी दिला.

खरात-आहेरचा महिलेवर दबाव

सूत्रांनी सांगितले की, ठाण्यातील महिलेला आहेरने नाशिक येथे आणल्यावर भोंदू खरातनेही तिच्यावर दबाव टाकला होता. पीडितेला ‘तुझे भविष्य खूप संकटात आहे तुला नाशिकचे कॅप्टन खरात वाचवू शकतात’ असे तो वारंवार सांगत होता. खरातच्या सांगण्याहून आहेरने पीडितेवरून लिंबू उतरवणे, गळ्यात मोती घालण्यास सांगून आघोरी कृत्य केले. एक बाजूला उच्चपदस्थ अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला जादूटोणा करणारा भोंदू खरात अशा जोडगोळीने पीडितेवर दबाव निर्माण केला होता.

बिगर खातेदाराच्या नावे जगदंबा पतसंस्थेत ५७ लाखांचा व्यवहार

सिन्नर | मी एकदाही सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीतील जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत पतसंस्थेत गेलो नाही. मी खातेदार नाही. भोंदू खरातला एकदाही भेटलेलो नाही तरी या पतसंस्थेत माझ्या नावे ​ खाते उघडण्यात आले. त्याला ‘वारस’ म्हणून खरातची नोंद होती. त्यावरून ५७ लाखांचे व्यवहार झाले. नंतर ते खाते बंदही करण्यात आले, अशी तक्रार नारायण घोटेकर (रा. घोटेवाडी) यांनी दाखल केली. त्यावरून सिन्नर पोलिसांनी खरातसह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे.

खरातविरोधात दाखल झालेला हा १८ वा गुन्हा आहे. त्याने अशाच पद्धतीने ३२ जणांच्या नावे बनावट खाती उघडून करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे. ओळखीचा फायदा घेऊन संस्थेत बनावट खाते उघडून त्या खात्याला ‘वारस’ म्हणून स्वतःचे नाव लावून हा गोरखधंदा सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. खरात आणि घोटेकर (रा. घोटेवाडी) यांच्या गावातील वस्त्या एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहेत.

खरातला मळमळ अन् उलट्यांचा त्रास

नाशिक | एसआयटीच्या कोठडीत भोंदू खरातला मंगळवारी सकाळी मळमळ व उलटी झाली. तो ५ आजारांवर गोळ्या औषध घेत आहे. त्याचे वजनही कमी होत आहे. अशातच रुग्णवाहिका अकादमीत शिरल्याने खरातची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks