रोहित पवारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो:अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण केले जातेय, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप




अजित पवार यांच्या कथित भीषण विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेवर आमदार रोहित पवार यांनी वारंवार संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला असून, ‘या प्रकरणात अद्याप एफआयआर का नोंदवण्यात आला नाही?’ असा सवाल करत त्यांनी आज पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली; दरम्यान, रोहित पवारांच्या या भूमिकेवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली पहिली तिखट प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार रोहित पवार हे फक्त चमकोगिरी करत आहेत, अजित पवार यांच्या अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. कालच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळा प्रकरणात रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, रोहित पवार यांना विमान अपघातामधले काय समजते? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एकाच प्रकरणात दोन ठिकाणी गुन्हे दाखल होत नाहीत. 2001 साली याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. काल रोहित पवारांनी पोलिस ठाण्यात राडा घातला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? रोहित पवार चमकोगिरी करत आहेत, रोहित पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार या डंके की चोट पर काम करत आहेत. रोहित पवार यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, याप्रकरणी फक्त त्यांचा जबाब घेतला जाऊ शकतो, रोहित पवार राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचा आरोप दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि व्हीएसआर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. काल ते मुंबईतील मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी रोहित पवार आणि पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. आता या प्रकरणात मरीनड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांच्या तक्रारीबाबत निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *