Ramdas Athawale Parliament Speech On Abhijeet Dipke & NEET Protest


‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर उभारण्यात आलेले यशस्वी आंदोलन आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. या आंदोलनाची दखल आता थेट संसदेतही घेण्यात आली आहे. संसदेच्या सुरू असलेल्या पा

.

संसदेत भाषण करताना रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्या कवीच्या शैलीत म्हटले की, “अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके.” आठवलेंच्या या फटकेबाजीवर उपस्थित सर्वच खासदारांना हसू अनावर झाले.

अभिजीत दिपके यांचे कौतुक करताना आठवले पुढे म्हणाले की, “अभिजीत दिपके हा माझ्याच समाजातील तरुण असून तो एक पक्का आंबेडकरवादी आहे. त्याने ज्या विषयावर हे आंदोलन छेडले, तो खरोखरच अत्यंत महत्त्वाचा विषय होता.”

लाठीचार्जचे समर्थन नाही, चौकशी व्हावी

संसदेवरील मोर्चादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरही आठवलेंनी सरकारची बाजू मांडतानाच पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, “सलग २५ दिवस हे आंदोलन अत्यंत शांततेत आणि संयमाने सुरू होते. आंदोलकांना रेल भवनपर्यंत जाण्याची रीतसर परवानगी देण्यात आली होती. तोवर कोणत्याही पोलिसाने बळाचा वापर केला नाही.”

“मात्र, जेव्हा जमावाने संसदेकडे जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक झाल्याचा प्रकार घडला, तेव्हाच पोलिसांना नाईलाजाने लाठीचार्ज करावा लागला. असे असले तरी, मी या लाठीचार्जचे अजिबात समर्थन करत नाही आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.

जनक्षोभामुळेच गेले धर्मेंद्र प्रधानांचे पद

जंतरमंतरवरील या ऐतिहासिक आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा मोदी सरकार बारकाईने पाहत होते. विद्यार्थ्यांचे हित आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेऊनच केंद्र सरकारने तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, अशी स्पष्ट कबुली रामदास आठवलेंनी दिली. दरम्यान, शिक्षण खात्याची धुरा आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कसा उभा राहिला ‘CJP’चा लढा?

सोशल मीडियावरील क्रांती: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (CJP) अभिनव घोषणा केली होती.

तरुणांची उत्स्फूर्त साथ: काही दिवसांतच ‘Gen-Z’ मध्ये या मोहिमेची मोठी क्रेझ निर्माण झाली आणि देशभरातील लाखो तरुण याच्याशी जोडले गेले.

अमेरिकेतून थेट जंतरमंतर: या अभूतपूर्व प्रतिसादानंतर दिपके यांनी अमेरिकेतून भारतात येत थेट दिल्ली गाठली. ‘नीट’ पेपरफुटीविरोधात त्यांनी सुरू केलेल्या या निर्णायक लढ्यामुळेच अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले आणि या आंदोलनाने देशभरात इतिहास रचला.

हे ही वाचा…

वन विभागाच्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना अटक:सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर एसीबीची कारवाई, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

बीडमध्ये एकीकडे जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना, दुसरीकडे मात्र शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराची कोट्यवधींची ‘डील’ करण्यात मग्न होते. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून बाहेर पडलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. स्वतःच्याच राहत्या घरी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लखमावार रंगेहाथ जाळ्यात सापडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *