नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील गांधी पुतळा परिसरातील मार्केटमध्ये एका ज्येष्ठ महिलेच्या पाकिटावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास गांधी पुतळा परिसरातील मार्केटमध्ये ही घटना घडली. अज्ञात दोन चोरट्यांनी लक्ष्मीबाई सायलू गंगलवार (वय 67, रा. चिखलवाडी, नांदेड) यांच्या पाकिटातील कानातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी लक्ष्मीबाई गंगलवार यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 387/2026 भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 366
