श्रीकांत  वारे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – VastavNEWSLive.com


नांदेड (प्रतिनिधी)- हंगरगा (ता. मुखेड) येथील सुपुत्र श्रीकांत मलिकार्जुन वारे यांना द टाइम्स ऑफ इंडिया आयोजित ET Enterprise Security Awards 2026  मध्ये Rising Star of the Year या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्रीकांत वारे यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे हंगरगा गावासह संपूर्ण मुखेड तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. या अद्वितीय यशाबद्दल श्रीकांत वारे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post Views: 170






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *