आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप:‘रामायण’सह दोन बिग-बजेट चित्रपटांत झळकणार, ‘रामायण’ आणि ‘नयी नवेली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला




राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे त्यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आता दोन बड्या बिग-बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत असून या चित्रपटाचं दिग्दर्शन दोन पूर्णपणे वेगळी दृष्टी असलेल्या दिग्दर्शकांनी केले आहे. आदिनाथ कोठारे “रामायण” मध्ये – दंगलफेम दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी भव्य चित्रपटात दिसणार असून ऐकीकडे नयी नवेली – बालाजी मोहन दिग्दर्शित भव्य स्तरावरील अनोख्या संकल्पनेवर आधारित मनोरंजक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे. या दोन चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे असे दोन दिग्दर्शक जे कायम वैविध्यपूर्ण विषयावर आधारित कलाकृती घडवत आले आहेत. दिग्दर्शकांचा काम करण्याचा दृष्टिकोन हा कायम चित्रपटाना वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. आदिनाथने देखील या दोघांच्याही अपेक्षा उत्तमरीत्या पूर्ण केल्या आहेत. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे सांगतो, “बालाजी मोहन आणि नितेश तिवारी या दोन दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करणं हा माझ्यासाठी एका मोठ्या मास्टरक्लाससारखा अनुभव होता. बालाजी सर फँटसी, कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि मोठ्या कलाकारांच्या फळीला अत्यंत शांतपणे आणि सहजतेने एका सूत्रात बांधतात. सेटवरचा त्यांचा संयम थक्क करणारा असतो. तर दुसरीकडे, नितेश सरांचं व्हिजन अथांग आणि भव्य आहे; महाकाय कॅनव्हासवर काम करतानाही ते भावनिक बारकावे आणि अचूक नियोजन कधीही सुटू देत नाहीत. एवढ्या मोठ्या स्केलचा चित्रपट साकारताना स्वतःची दृष्टी पूर्णपणे स्पष्ट ठेवणं आणि कलाकाराला विश्वास देणं, ही या दोन्ही दिग्दर्शकांची सर्वात मोठी ताकद आहे.” राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते आता बॉलिवूडमधील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनण्यापर्यंतचा आदिनाथचा प्रवास हे सिद्ध करतो की कायम उत्तम काम करून वेगवेगळ्या उंचीवरचे चित्रपट केले पाहिजे. रामायण ५ नोव्हेंबर तर नयी नवेली १६ ऑक्टोबरया चित्रपटांसह बॉलिवूड आदिनाथ यांच्या दमदार आणि बहुआयामी अभिनयाची ताकद अनुभवण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *