एलसीबीचे पोलीस निरीक्षक खंडेराय यांच्या पथकाची दमदार कामगिरी 


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 2 लाख 29 हजार 408 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या पथकाने केली.
नांदेड जिल्हा पोलीस यांच्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

1. सागरसींग उध्दवसींग टाक (वय 38, रा. हनुमान गल्ली, उमरी)
2. गजाननसींग ठाकुरसींग बावरी (वय 21, रा. उमरी)

पोलिसांनी आरोपींकडून
▪️ 1 किलो वजनाची चांदीची चैन – अंदाजे किंमत 1,75,000 रुपये
▪️ चांदीचे दोन कडे (20.400 तोळे) – किंमत 54,408 रुपये
असा एकूण 2,29,408 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उदय खंडेराय  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस अंमलदार मिलिंद नारबाग, दिलीप कुमार चंचलवार,सिद्धार्थ सोनसळे, दीपक ओढणे या पथकाने केली.
घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले असून पुढील तपास विमानतळ पोलीस ठाणे करीत आहे. या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळीवर मोठा आळा बसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *