प्रभू  सावंत महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानीत


नांदेड (प्रतिनिधी) -दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी अखिल भारतीय बौध्द  धम्म परिषद किनवट येथे आयोजित केलेल्या यंदा विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आसुन ह्यावर्षी  महात्मा फुले शिक्षक रत्न 2026 चा पुरस्कार  प्रभू सटवाजी सावंत  यांना मान्यवराच्या हास्ते प्रदान करण्यात आला आहे.
प्रभू  सावंत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर दलित पँथर, भारिप बहुजन महासंघ, तसेच विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत राहून समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी संघर्ष केला आहे.
त्यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक सकारात्मक सामाजिक चळवळींना गती मिळाली.
‌  प्रभु सावंत यांना आज तागायत  मिळालेले मान्यताप्राप्त पुरस्कार रिपब्लिकन मित्र पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, धम्मरत्न पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तुफानातील दिवे वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार आंबेडकर फेलोशीप या पुरस्कारांनी त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली दाद अधोरेखित होते.
दिनांक 15 जानेवारी किनवट येथे भव्य अशा अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली ह्या वर्षी प्रभू सावंत यांना  डॉ. रोहित पिसाळ गोल्डन मॅन मुंबई विशाल लोंढे समाज कल्याण आयुक्त पुणे माजी आमदार  विजय खडसे कार्यक्रमाचे आयोजक दयाभाऊ पाटील निमंत्रक अभय नगराळे स्वागत अध्यक्ष प्रा. डॉ.मोहनराव मोरे आदींच्या  हस्ते महात्मा फुले शिक्षक रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
प्रभु  सावंत यांना हा पुरस्कार मिळताच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. म. न. पा. गटनेते इंजि.प्रशांत इंगोले अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे प्रा. जे.टी. जाधव शिवाजी भदरगे प्रा. अविनाश नाईक वामनराव कावळे रवींद्र सोनकांबळे मायाभाऊ नांदेडकर आदिने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 9






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *