नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंटूर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹2 लाख 43 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे कुंटूर येथील फिर्यादी विद्याधर गोविंद देवधरे (वय 28) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹2,43,000 किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 185/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 305 व 331(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासपोलीस अंमलदार कानगुले करीत आहेत.
